शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

बिरबल आणि गेंड्याची कातडी

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे.

गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे. मग तो एक शिंगीगेंडा असो की दोन शिंगांचा. माणूसही प्रसंग, परिस्थितीनुसार गेंड्याची कातडी पांघरतो. तर या गेंडापुराणाचे कारण म्हणजे औरंगाबाद महापालिकेत यावरून गदारोळ झाला. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा उल्लेख गेंड्यांच्या कातडीचे असा केला आणि आंतरिक संवेदनेने हेलावलेल्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांसाठी बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेतून बर्हिगमन केले. शहरातील खड्ड्यांमुळे संवेदनांचे कोंब फुटलेल्या नगरसेवकांचा हा आरोपच एवढा अनकुचीदार होता की, नगरसेवकांनी म्हटलेल्या गेंड्याच्या कातडीचा वेध घेत अधिकारी घायाळ झाले. काय हा प्रसंग. खड्डे हेच आपले प्राक्तन मानणाऱ्या औरंगाबादकरांच्या नशिबी आला. यापेक्षा खड्ड्यात सुखेनैव राहण्याची सवय केलेली बरी. तरी बरे, ज्या सभागृहात हे घडले ते तिथल्या भिंती, छतासाठी नवीन नव्हते. याच सभागृहाने नगरसेवकांनी पूर्वीच्या आयुक्तांवर ‘निकम्मा’, ‘जातीयवादी’, ‘ढिम्म’, ‘अकार्यक्षम’ अशा शब्दांमध्ये केलेली संभावना विसरलेली नाही. त्यात गेंड्याची कातडी हा शब्द तर गुळगुळीत झाला आहे. आयुक्त बकोरियांच्या जाणिवा अजून बोथट झाल्या नाहीत असेच आपण समजायचे. खरे म्हणजे कायद्याने दिलेले अधिकार आणि तांत्रिक ज्ञानाच्या आयुधांचा वापर करून या सर्वांना नामोहरम करणे त्यांना अवघड नव्हते. कारण तांत्रिक बाबींचा आधार घेत कोणी गेंड्याची कातडी पांघरूण त्यावर झुळझुळीत रेशमी उपरणे पांघरले आहे. याचा ते ‘उपरणे फाश’ करू शकले असते पण त्यापेक्षा त्यांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.शहरांचा खड्ड्यांच्या इतिहासाकडे जरा नजर टाकली तर औरंगाबादकरांना आता चांगल्या गुळगुळीत रस्त्यावरून वावरण्याची सवय राहिली नाही. नटीचा गाल आणि गुळगुळीत रस्ता, असे समीकरण मांडले जाते म्हणून औरंगाबादकर आता रस्त्यावरील गड्ड्यांपेक्षा नटीच्या गालांवरील खळ्याच पाहण्यात धन्यता मानतात. शहराच्या ११५ वॉर्डात १३०० कि.मी. रस्ते आहेत. यापैकी २१ कि.मी. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या खात्याच्या नियमानुसार १ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी खर्च येतो म्हणजे शहर गुळगुळीत करायचे तर १३०० कोटी खर्च आणि एवढा पैसा आणणार कोठून? २०१३ मध्ये व्हाईट टॅपिंगचे तंत्रज्ञान शहरात आले, त्यात १२५ कोटी रुपयांची कामे झाली, तर तीनच वर्षांत रस्ते खराब झाले कसे. कर्मचारी, शाखा अभियंते यांना आरोपींच्या कडघऱ्यात उभे करण्यास नगरसेवक का धजावले नाही? भूमिगत गटार योजनेची कामे शहरात चालू असल्याने रस्ते उखडले, पण हे रस्ते पूर्ववत व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असताना ती कामे नगरसेवक का करवून घेत नाहीत. ७ वर्षाच्या आत रस्ता खराब झाला तो पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते, पण महापालिकेच्या रस्त्याची मुदत ३ वर्षांचीच आहे. नगरसेवक ही मुदत किमान ५ वर्षांची का करीत नाहीत? बरे हे सर्व कंत्राटदार कोण आहेत? व्हाईट टॅपिंगची किती कामे झाली हे न उलगडणारे कोडे नगरसेवक का सोडवत नाहीत? रस्त्यांचा आणि त्यावरील खड्ड्यांचा इतिहास शोधताना सामान्य माणसांना असे अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरे मिळत नाहीत आणि शोधूनही सापडत नाहीत. आता प्रस्तावित विकास आराखड्यात आणखी १२५ कि.मी. नवीन रस्त्यांची भर पडणार आहे. गेंड्याला कातडीचे संरक्षण का असते याचा उलगडा सुरुवातीलाच केला, पण माणूस गेंड्याची कातडी का पांघरतो यावरही संशोधन झाले आहे. भ्रष्टाचार, गैरकारभार, अनैतिकतेचा चिखल आणि दलदलित सापडला की तो गेंड्याची कातडी पांघरतो. एकदा अकबराच्या दरबारात बहुरूपी बैलाचे सोंग घेऊन आला. त्याच्या अदाकारीने सारा दरबार स्तिमित झाला. बहुरुप्यावर स्तुतिसुमनांची उधळण सुरू होती, पण बिरबल या सर्वांकडे निर्विकारपणे पाहत होता. बादशहाने विचारले, ‘‘बिरबला तू एवढा अरसिक कसा? त्यावर बिरबल म्हणाला, याची परीक्षा घेतली पाहिजे. तुम्ही त्याच्या दिसण्यावर भाळला’’ असे म्हणत बिरबलाने एक खडा त्या बैलरूपी बहुरुप्याच्या पाठीवर मारला तर बहुरुप्याची कातडी थरारली. त्यावर बिरबलाने ‘बहोत खूब’ अशी दाद दिली. आता प्रश्न आहे औरंगाबादेत गेंड्याची कातडी नेमकी कोणी पांघरली? बरे, हे शोधण्यासाठी आमच्याकडे बिरबल आहे का? सुधसुधीर महाजन ाहाजनसुधीर महाजन