शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक यंत्रणेचा फज्जा

By admin | Updated: May 29, 2015 00:22 IST

देऊळगाव राजा येथील शासकीय कार्यालयातील प्रकार ; शासकीय कार्यालयातील मशीन धूळ खात.

देऊळगावराजा ( जि. बुलडाणा) : राज्यात ई- प्रशासन अधिक सक्षम कसे करता येईल, यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. देऊळगावराजा तालुक्यातील शासकीय कार्यालयांनी मात्र शासनाच्या या धोरणाला बगल दिली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने प्रशासकीय यंत्रणा हायटेक करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेट सुविधेशी जोडलेली बायोमेट्रिक प्रणाली अमलात आणली; मात्र कर्मचार्‍यांच्या येण्या-जाण्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बायोमेट्रिक यंत्रेणेचा फज्जा उडाला आहे. शासकीय कार्यालयामध्ये पेपरलेस कामकाज होण्यासाठी इंटरनेट सेवेवर भर देण्यात येत आहे. कार्यालयातील सर्व कामे ऑनलाईन झाले आहे. यातून नागरिकांना विविध सुविधाही ऑनलाईनच पुरविल्या जाते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रत्येक शासकीय कार्यलयामध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर हजर व्हावेत, याची नोंदणी घेण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली शासनाकडून कार्यान्वित करण्यात आली. या यंत्रणेद्वारे कार्यालयात येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना हजेरी पुस्तिकेवर हजेरी लावण्याऐवजी बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून थंब मशीनवर आपला अंगठा दाबून हजेरी लावावी लागते; परंतु देऊळगावराजा तालुक्यांतील पंचायत समिती, नगर परिषद, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय कोणत्याही प्रकारची बायोमेट्रिक प्रणालीचा अद्यापही कुठलाही वापर सुरू झाला नाही. त्यामुळे कार्यालयात या मशीन केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. पंचायत समितीमधील बायोमेट्रिक यंत्रणा दिसत नाही. नगर परिषदमध्ये लागलेली बायोमेट्रिक यंत्रणेकडे सर्वांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.