शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री वर्षभरापासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:41 IST

घाटीत केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ३० कोटी अशा अर्थसाहाय्यातून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत उभी आहे.

ठळक मुद्देकॅथलॅब, सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची यंत्रे पडून

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या १५० कोटींच्या निधीतून घाटीत उभे राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत गेल्या वर्षभरापासून कोट्यवधींची यंत्रसामग्री वापराविना पडून आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हाेणारी कॅथलॅब, सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची यंत्रे धूळ खात आहे. रुग्णसेवेत येण्यापूर्वीच वापराविना या कोट्यवधींच्या यंत्रांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, कोरोना प्रादुर्भावात यंत्रसामग्रींकडे दुर्लक्ष होत आहे.

घाटीत केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ३० कोटी अशा अर्थसाहाय्यातून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत उभी आहे. या ठिकाणी युराेलाॅजी, नेफ्राॅलाॅजी, न्यूराॅलाॅजी, कार्डियाेलाॅजी, निओनॅटाॅलाॅजी, वर्न-प्लास्टिक सर्जरी, आदी सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचे नियाेजन आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून या इमारतीत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सगळ्यात या उपचारांसाठी दाखल झालेली कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री तशीच पडून आहे. यंत्रसामग्री प्लास्टिकच्या पोत्यांनी झाकून ठेवण्याची वेळ ओढवली आहे. प्रत्येक यंत्राचा एक वाॅरंटी, गॅरंटी कालावधी असतो. यंत्रसामग्री इमारतीत बसवून झाली आहे. परंतु, रुग्णांना वापरच होत नसल्याची स्थिती आहे. जेव्हा ही यंत्रे रुग्णसेवेत आणली जातील, तोपर्यंत ती सुरक्षित राहतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी सुपर स्पेशालिटी ब्लाॅकचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांना विचारले असता, इमारतीत सध्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी मर्यादा पडत आहे. कॅथलॅबच्या इन्स्टाॅलेशनचे काम पूर्ण झाले आहे. कॅथलॅब सुरू करण्यासाठी परवानगी मागितली असून, परवानगी येताच योग्य ती कार्यवाही केली जाईल.

कॅथलॅबची २.१९ कोटींची यंत्रसामग्रीटर्न की प्रकल्पात पाचव्या मजल्यावर कॅथलॅब साकारण्यात आली आहे. याठिकाणी तब्बल दोन कोटी १९ लाख १० हजार रुपयांची यंत्रसामग्री बसविण्यात आलेली आहे. यात हिमोडायनामिक रेकाॅर्डर, डिफ्रिलेटर, ऑपरेशन लॅब वीथ लेड ग्लास, एव्हॅटिक बलून पंप, अनेस्थेशिया वर्क स्टेशन, आदींचा समावेश आहे. या इमारतीत एकूण सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सज्ज झाले आहे. त्यातील यंत्रसामग्रींची किंमत किमान १० कोटींची असल्याचे समजते. पण, त्यांचा वापर सुरूच झालेला नाही.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होऊ शकते सुरूसुपर स्पेशालिटी इमारतीत कॅथलॅब तत्काळ सुरू होऊ शकते. कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळताच घाटीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सुरू होऊ शकते. घाटीत त्यासाठी मानद तज्ज्ञही उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी घाटीत होत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे.

यंत्रे कार्यान्वित झाल्यानंतर वाॅरंटी कालावधीसुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत सध्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. या ठिकाणी कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. यंत्रसामग्री ज्या दिवशी सुरू होतील, तेथून पुढे वाॅरंटी कालावधी राहील.- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी