शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे वीज बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:22 IST

जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे थकीत वीज बिल महावितरण कंपनीने वसूल केले नाहीतर प्रहार संघटनेने त्यांच्या निवासस्थानाचे वीज कनेक्शन कापण्याचा इशारा दिला होता. या सगळ्या गदारोळात जिल्हा प्रशासनाने सुमारे ४ लाख रुपयांचे वीज बिल महावितरण कंपनीला अदा केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे थकीत वीज बिल महावितरण कंपनीने वसूल केले नाहीतर प्रहार संघटनेने त्यांच्या निवासस्थानाचे वीज कनेक्शन कापण्याचा इशारा दिला होता. या सगळ्या गदारोळात जिल्हा प्रशासनाने सुमारे ४ लाख रुपयांचे वीज बिल महावितरण कंपनीला अदा केले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी निवासस्थानाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येणार या माहितीमुळे पोलिसांनी सोमवारी दिवसभर बंदोबस्त लावला होता; परंतु वीज बिल भरल्याचे पुरावे संघटनेला जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले.७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांच्या निवासस्थानाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देणारे आंदोलन संघटनेने केले होते. तसेच ११ डिसेंबर रोजी महावितरण कंपनीला संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे थकीत वीज बिल वसूल करण्याचा इशारा दिला होता. सामान्य शेतकºयांचा वीजपुरवठा केला जात नाही.शिवाय कमी दाबाने वीजपुरवठा करूनही मोठ्या रकमेची वीज बिले त्यांना दिली जात आहेत. विजेचा लपंडाव ग्रामीण भागात सुरू आहे. दुसरीकडे लाखो रुपयांचे वीज बिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे थकलेले असताना त्यांना अखंड वीजपुरवठा सुरू असतो, असे संघटनेने महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले होते.दरम्यान, प्रहार संघटनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानाची सोमवारी वीज कापणार, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत निवासस्थानाभोवती बंदोबस्त लावला होता.सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, सोमनाथ रोडे, शेख यांच्यासह सहकारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानासमोर तैनात होते. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण म्हणाले, निवासस्थानाची वीज कापण्यासाठी प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे तातडीने जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्त लावला. संघटनेचे कुणाल राऊत, संजय चव्हाण, अमित दांडगे, शिवाजी गाडे, अवी जगधने यांनी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता.प्रशासनावर ओढवली नामुष्कीदोन महिन्यांचे वीज बिल थकविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. जिल्हा प्रशासनाने संघटनेच्या प्रहारानंतर वीज बिल भरले. वीज मीटर क्रमांक ४९००१०६९८६५८ चे ६४ हजार ३८६, ४९००१११९७९९७ चे २ लाख ७१ हजार ८३, ४९००१०९५७५७२ चे १३ हजार ९४६, ४९००११०५८८०६ या मीटरचे ५ हजार ५५३५ असे ३ लाख ५५ हजार ८५० रुपयांचे वीज बिल थकले होते. १६ डिसेंबर रोजी प्रशासनाने हे बिल अदा केले.महावितरणचे कार्यकारी अभियंता चिटणीस म्हणाले, महावितरणचे कुठलेही पथक निवासस्थानाकडे गेले नाही. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय व निवासस्थानाशी निगडित वीज बिलांचा भरणा प्रशासनाने केला आहे.