शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

शिक्षणाच्या बाजाराला अब्जावधीचे पंख़़!

By admin | Updated: June 15, 2014 00:56 IST

लातूर : ज्याप्रमाणे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर संबोधले जात आहे, तसे आता लातूरला शिक्षणपंढरीची उपाधी मिळू लागली आहे़

लातूर : ज्याप्रमाणे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर संबोधले जात आहे, तसे आता लातूरला शिक्षणपंढरीची उपाधी मिळू लागली आहे़ अगदी केजी टू पीजी शिक्षणात निर्माण झालेला ‘लातूर पॅटर्न’ राज्यभरातील विद्यार्थ्यांना खुणावतोय. साधारणत: लाखभर विद्यार्थी प्रतिवर्षी बाहेरुन लातुरात शिक्षणासाठी येऊ लागले आहेत़ आता प्रवेश प्रक्रियाही सुरु होत आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग वाढली आहे़ नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना सर्व काही नवेच हवे, या बालमंडळींच्या अट्टाहासापोटी पालकांना शैक्षणिक बाजारपेठेची वाट धुंडाळावी लागते. शैक्षणिक शुल्कापासून सुरु होणारा प्रवास शैक्षणिक साहित्य, स्कूल बस, गणवेशापर्यंतही संपत नाही़ यात पालकांच्या खिशातून सव्वाशे कोटींपेक्षाही अधिक रक्कम ढिली होत आहे़वह्या, पुस्तकांसाठी गर्दीशैैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशाच वह्या-पुस्तकांच्या खरेदीने करण्यात येतो़ सध्या पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके शाळेतून मोफत देण्यात येत असल्याने पुस्तकांची डिमांड घटली आहे़ परंतु, त्यापुढील वर्गांच्या पुस्तकांची खरेदी जोरात सुरु आहे़ शिवाय, इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमाची पुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ प्राथमिक शाळेच्या पुस्तकांची विक्री कमी असली तरी रीडर व गाईडची खरेदी मात्र चांगली होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ पाटी आता हळूहळू कालबाह्य होत चालल्याने वह्यांना चांगले दिवस आले आहेत़ अगदी ज्युनिअर केजीपासून वह्यांचा वापर केला जात आहे़ विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वह्यांची निर्मिती केली जात आहे़ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपाठोपाठ लाँग बुकची क्रेझ आता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांपर्यंतही येऊन पोहोचली आहे़ कार्टून, सिनेनट, नट्यां, निसर्ग छायाचित्रांच्या मुखपृष्ठासह उपलब्ध झालेल्या वह्या विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतात़ १५० रुपये ३६० रुपये प्रतिडझन असा या वह्यांचा दर आहे़लातूर, अहमदपूर, उदगीर ही शहरे प्रामुख्याने अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध पावली आहेत़ अभियांत्रिकी, मेडिकलच्या प्रवेशाचा मार्ग येथूनच जात असल्याने या लातूरकडे राज्यभराचे डोळे लागलेले असतात़ अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर शिक्षणाचा हा लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे लातूर शहरात तसेच इतरही शहरांमध्ये शैक्षणिक वातावरणाची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे अगदी केजीपासूनच मुलांना येथील शैक्षणिक संस्कारात वाढविण्यासाठी पालक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे़ शासकीय नोकरदारांपासून ते शेजारच्या गावातील नागरिकही शिक्षणासाठी पाल्यांना लातुरात ठेऊन ते स्वत: नोकरीच्या ठिकाणी किंवा गावाकडे ये-जा करीत आहेत़ त्यामुळे लातुरातील शिक्षणेच्छुकांची गर्दी वाढली आहे़ ज्यांना पाल्यांसमवेत राहणे शक्य नाही, असे पालक मुलांना खाजगी निवासी क्लासेसमध्ये ठेऊन शिक्षणाचे धडे देत आहेत़ परिणामी, हॉस्टेल, मेस, क्लासेस, शैैक्षणिक साहित्याच्या बाजारपेठेची चांगलीच चंगळ होत आहे़ कोणत्याही बाबीची उलाढाल कोटीतच असल्याने पालक शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड करीत नसल्याचेच स्पष्ट होत आहे़गणवेशांसाठी धावपळपहिली ते बारावीपर्यंतच्या जिल्ह्यात २४९९ शाळा आहेत़ या शाळांतून तब्बल ५ लाख ६२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ मोजक्याच खाजगी शाळा सोडल्या तर अन्य शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश सक्तीचा आहे़ त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होताना सर्वात अधी गणवेशासाठी धावपळ सुरु होते़ सध्या बाजारात रेडिमेड गणवेश उपलब्ध झाले आहेत़ परंतु, हे गणवेश काही मोजक्याच व मोठ्या शाळांचे असल्याने इतर लहान-मोठ्या शाळांचे गणवेश बऱ्याचदा शिवूनच घ्यावे लागतात़ बाजारपेठेत उपलब्ध असलेले रेडिमेड गणवेशाची किंमत ३०० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहे़ मात्र ज्या शाळांचे गणवेश बाजारात रेडिमेड मिळत नाहीत त्यांना मात्र शिवून घ्यावे लागतात़ त्यामुळे गणवेशाची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरु होते़ गणवेश शिवून घ्यायचा असेल तर साधारणत: खुले कापड विकत घ्यावे लागते़ ७० ते १५० रुपये प्रतिमीटर प्रमाणे शर्टपीस तर १८० ते ४५० रुपये प्रतिमीटर याप्रमाणे पँटपीस उपलब्ध आहेत़ त्यावर पुन्हा ३०० ते ४०० रुपये शिलाईसाठी खर्च करावे लागतात़ काही शाळा एकत्रित कापड खरेदी करुन विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करुन देतात़ गणवेश इतक्यावरच थांबत नाही़ तर टाय, सॉक्स, शूजही संगतीला लागतेच़ टाय १० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत़ बेल्ट २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकते़ सॉक्सच्याही किमती ३० ते ५० रुपये इतक्या आहेत़ १५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत स्कूल शूज बाजारात उपलब्ध आहेत़ या परिपूर्ण गणवेशावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च होत आहेत़वाढत्या स्पर्धेत शाळांनी वर्गाचे तास वाढविलेले दिसून येतात़ शिवाय, दूर अंतरावरुन विद्यार्थी शाळेत येत असल्याने दुपारच्या सुटीत जेवणासाठी घरी जाण्याचा प्रकार आता हळुहळु संपुष्टात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना टिफीन बॉक्स व वॉटर बॉटल सोबत बाळगणे गरजेचे बनले आहे़ त्यामुळे शैक्षणिक साहित्यात आता या साहित्यांचीही गणना होऊ लागली आहे़ वह्या, पुस्तके, बॅग, शूजसोबतच टिफीन, वाटर बॉटल खरेदी करण्यात येत आहे़ त्यातही बाजारपेठेत भरपूर चॉईस उपलब्ध आहेत़४टिफीन बॉक्सच्या प्रकारात लंच बॉक्स, मोगल स्लाड, हॉटपॉट टिफीन, बिन्नी लिटील कार्टून लंच बॉक्स असे विविध प्रकार आकर्षक कव्हरसह व कव्हरविनाही बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत़ त्यांच्या किंमती १०० रुपयांपासून अगदी ४०० रुपयांपर्यंत आहेत़ त्यापैकी हॉटपॉट व कार्टून लंच बॉक्सला विद्यार्थी, पालकांतून अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़४एरवी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे पाण्याची बाटली हमखास दिसतेच़ त्यामुळे थंडा फंडा, स्कूल फंडा, छोटा भीम, डिनो अशा विविध प्रकारच्या आकर्षक बाटल्या ३० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत़‘सॅक’ची क्रेझवह्या, पुस्तकांसोबतच त्यांचे ओझे सांभाळणाऱ्या बॅगा खरेदी करण्याकडेही पालकांचा कल आहे़ साधारणत: एक बॅग दोन-तीन वर्षांपर्यंत चालते़ परंतु, प्राथमिकचे विद्यार्थी प्रतिवर्षी नवीन बॅगसाठी हट्ट धरतात़ त्यामुळे बाजारपेठेत विक्रीही जोरात होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ दोन-तीन वर्षांपूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत ‘हम-तुम’ बॅगची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती़ प्रत्येक महाविद्यालयीन तरुणाकडे ही बॅग हमखास असायचीच़ परंतु, तो ट्रेंड आता मागे पडला आहे़ याशिवाय माध्यमिकच्या विद्यार्थ्यांपर्यंत चौकोनी आकाराचे दफ्तर मोठ्या प्रमाणात वापरले जात होते़ मात्र तोही ट्रेंड आता कमी होऊ लागला आहे़ माध्यमिकच्या विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणापर्यंत सध्या पाठीवरील सॅकची क्रेझ आली आहे़ विविध डिझाईन्समध्ये २०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत या सॅक उपलब्ध झाल्या आहेत़पूर्वी कम्पासमध्ये फारश्या चॉईस उपलब्ध नव्हत्या़ परंतु, आता बाजारपेठेत अनेक व्हरायटीज मिळू लागल्या आहेत़ अगदी कम्पास बॉक्स वेगळा अन् सुटे साहित्य वेगळे मिळू लागले आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना चॉईस मिळाला आहे़ लोेखंडी पत्रा असलेले कम्पास कमी होत चालले आहेत़ त्यांची जागा आता प्लास्टिकच्या कम्पास बॉक्सनी घेतली आहे़ बॉक्सवर आकर्षक छायाचित्रे, कार्टून्सची छपाई करुन विद्यार्थ्यांना आकर्षित केले जात आहे़ ४० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत असे बॉक्स उपलब्ध झाले असून त्यात कम्पासमधील सुटे साहित्य वेगळे खरेदी करुन ठेवता येते़ कम्पासच्या साहित्यासोबतच पेन्स, पेन्सिलचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे़