शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कोट्यवधींची शिष्यवृत्ती वाटप; आता समाज कल्याण तपासणार विद्यार्थ्यांचा हजेरीपट

By विजय सरवदे | Updated: June 14, 2024 14:45 IST

चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले असून ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत.

छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के हजेरी आवश्यक आहे. पण, हा नियम किती विद्यार्थी आणि महाविद्यालये अमलात आणतात, याची खातरजमा करण्याचा निर्णय आता समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्यामुळे बोगस हजेरीपट दाखल करणाऱ्या महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले असून ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. गेल्या शैक्षणिक वर्षात (सन २०२२-२३) जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ आणि एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गाच्या ३७ हजार ८८७ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता. चालू शैक्षणिक वर्षात (सन २०२३-२४) आतापर्यंत दोन्ही मिळून ७० हजार ६३५ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्राप्त झाले असून अजूनही ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकले आहेत.

विशेष म्हणजे, महाविद्यालयांनी ७५ टक्के हजेरीबाबत दिलेल्या पत्रावर विश्वास ठेवून समाज कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. मात्र, जिल्ह्यात अशी काही महाविद्यालये आहेत, जिथे प्रवेश घेतल्यावर थेट परीक्षेलाच विद्यार्थी जातात. विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कावर काही महाविद्यालये सुरू आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर आता समाज कल्याण जिल्हा कार्यालयाने हजेरीची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

परिपूर्ण अर्जासाठी शनिवारपर्यंतची मुदतसद्य:स्थितीत अनु. जातीच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी २७ हजार ७८१ अर्ज महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड केले असून, प्राप्त अर्जांपैकी २७ हजार ८९ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत, तर एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी ३४ हजार ४४० अर्ज महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पाठविले. त्यापैकी ३४ हजार ३८९ अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ६१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले आहे. आता शनिवारपर्यंत उर्वरित विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण