शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! २,६०० कोटींतून औट्रम घाटात १२.५ किमी लांबीचा बोगदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:12 IST

अलायन्मेंट मंजुरीसाठी ‘एनएचएआय’च्या मुख्यालयाकडे; मंजुरी मिळताच डीपीआर अन् निविदा

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्ग क्र. ५२ वरील कन्नड येथील औट्रम घाटात ‘एनएचएआय’च्या माध्यमातून १२.५ किमी अंतरात बोगदा बांधण्यासाठी तयार केलेले अलायन्मेंट मंजुरीसाठी एनएचएआयच्या (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) मुख्यालयाकडे पाठविण्यात आले. २,६०० कोटींतून बोगद्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अलायन्मेंटला मंजुरी मिळताच डीपीआर अंतिम होईल, त्यानंतर निविदा प्रक्रियेची तयारी होईल.

४ एप्रिल ते २ जून रोजीपर्यंतचा कालावधी औट्रम घाटात रेल्वेमार्ग आणि बोगदा बांधणी एकत्रित बांधणीच्या प्रस्तावाच्या चर्चा आणि बैठकीत गेला. हा प्रस्ताव येण्यापूर्वीच एनएचएआयचे काम फार पुढे गेलेले होते. परंतु दाेन महिन्यांतील चर्चांमुळे एनएचएआयचा अलायन्मेंटचे प्रकरण रेंगाळले. आता रेल्वे आणि एनएचएआयचे काम सोबत होणार नसल्यामुळे फक्त एनएचएआयकडून २,६०० कोटींतून बोगदा बांधण्याचा प्रस्ताव निश्चित होईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यात नाशिकला जोडणाऱ्या नऊ मार्गांप्रकरणी एक बैठक होऊन औट्रम घाटात पहिल्या टप्प्यात बोगदा बांधण्याचे ठरले.

जड वाहतुकीस घाट अडीच वर्षांपासून बंदजड वाहतुकीस घाट अडीच वर्षांपासून बंद आहे. बोगदा किंवा पर्यायी मार्ग नसल्याने ११० किलोमीटर अंतराचा फेरा मारून २२ हजार वाहने रोज ये-जा करीत आहेत. भविष्यातील औद्योगिक उत्पादनामुळे या महामार्गावरून तब्बल चाळीस हजार वाहनांची वाहतूक होईल. त्यामुळे घाटातील बोगद्याचे काम लवकर होणे गरजेचे आहे. दीड दशकापासून हा प्रकल्प रेंगाळला असून, मराठवाड्यातील औद्योगिक व दळणवळणासह देशाच्या उत्तर-दक्षिण दिशांना जोडणारा हा मार्ग आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरूछत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी कन्नड तालुक्यातील चापानेर, जळगाव घाट, टाकळी लव्हाळी भागात रेल्वेच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, हे प्राथमिक सर्वेक्षण असून आणखी इतर ठिकाणांहूनही सर्वेक्षण होणार असल्याचे हे काम करणारे झारखंड राज्यातून आलेल्या सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या भागातून रेल्वेमार्ग गेल्यास कन्नड तालुक्यातील गावांच्या विकासाला चालना मिळेल.

प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षाअलायन्मेंट मंजुरीसाठी एनएचएआयच्या मुख्यालयाकडे पाठविले आहे. मंजुरीची प्रतीक्षा आहे. रेल्वे विभागाची स्वतंत्र मोजणी सुरू असेल, एनएचएआयचा स्वतंत्र प्रस्ताव आहे.- रवींद्र इंगोले, प्रकल्प संचालक, एनएचएआय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडी