शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय, जनसामान्यांच्या तक्रारी ऐेकण्यासाठी नेमले दहा अधिकारी

By विकास राऊत | Updated: October 6, 2023 13:37 IST

विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन घेण्यासाठी विभागनिहाय दिली जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रोज आंदोलने, निदर्शने होतात; तसेच विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन शिष्टमंडळे देखील येतात. या सगळ्या जनसामान्यांच्या तक्रारी, मागण्या ऐकून घेण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी १० अधिकाऱ्यांना नेमले आहे.

निवेदने स्वीकारणे, निवेदक व शिष्टमंडळे यांच्याशी चर्चा करणे, अधिक सुसूत्रता व सुटसुटीतपणा आणण्यासोबतच वेळेत बचत व प्रश्नांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांकडे आलेल्या निवेदनांवर शिष्टमंडळासोबत चर्चा करून नियमानुसार कार्यवाही करण्याचा प्रयत्न असेल. प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांना लेखी कळविण्यात येईल. अधिकाऱ्यांच्या परवानगीविना निवेदन देणाऱ्यांना कॅमेरा, मोबाइलचा वापर करता येणार नाही. निवेदनाबाबतची माहिती वेळोवेळी विभागीय आयुक्तांना सादर करावी लागेल. एखाद्या निवेदनात एकापेक्षा अधिक शाखांचे विषय असतील. तर ते निवेदन आधी पहिल्या विषयासंबंधित अधिकाऱ्याकडे जाईल. नंतर इतर विषयांबाबत संबंधित शाखांना कार्यवाहीसाठी प्रत दिली जाईल.

कोणते अधिकारी कोणते निवेदन स्वीकारणार...अतिरिक्त आयुक्त - १ : जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित सर्व निवेदने घेतील.महसूल उपायुक्त : महसूल विभाग, कनिष्ठ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विषय, गौण खनिज, इनाम, कुळ, अतिक्रमणे, गावठाण विस्तार, धार्मिक, सीलिंग इत्यादी.सामान्य प्रशासन उपायुक्त : पोलिस कायदा व सुरक्षा, सर्व बैठका, विभागीय आयुक्तालय प्रकरणी निवेदने, अधिकाऱ्यांना प्राधिकृत न केलेल्या विषयांची निवेदने.नगरपालिका प्रशासन उपायुक्त : नगरपालिका प्रशासन, महानगरपालिकाबाबतची सर्व निवेदने.रोहयो उपायुक्त : रोजगार हमी योजना व पाणीटंचाईबाबतीत सर्व निवेदने.पुरवठा उपायुक्त : अन्न व नागरी पुरवठा विषयांची सर्व निवेदने.पुनर्वसन उपायुक्त : पुनर्वसन व भूसंपादन विषयांवर निवेदने.आस्थापना उपायुक्त : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतविषयक सर्व निवेदने.नियोजन उपायुक्त : वित्त व नियोजन विषयावरील सर्व निवेदने.सहायक आयुक्त : ना-हरकत, रोस्टर, अज, अजा अन्याय याबाबतीत सर्व निवेदने.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय