शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासोबत भक्तीही; वेरुळातील कैलास लेणीत संपूर्ण रामायणाचे दर्शन

By संतोष हिरेमठ | Updated: January 22, 2024 14:15 IST

‘सियावर रामचंद्र की जय’!रामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत श्रीरामांचे दर्शन घडते. हो... हो... भगवान श्रीरामांचे दर्शन, तेही हजारो वर्षे जुन्या वेरूळ लेणीत. कदाचित अनेकांना हे माहीत नसेल. वेरूळ लेणीत श्रीरामांच्या दर्शनाबरोबरच रामायणातील अनेक प्रसंग कोरण्यात आले आहेत. पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांची भक्तीही साधली जाते.

वेरूळची कैलास लेणी हे संपूर्ण जगाला पडलेले कोडे आहे. एकसंध खडकातून कोरण्यात आलेली ही लेणी पाहण्यासाठी देश- विदेशांतून दररोज हजारो पर्यटक लेणीत भेट देतात. कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. वेरूळ लेणीमधील विविध प्रकारची शिल्पे पाहता या लेणीमध्ये संपूर्ण रामायण कोरलेले आहे. याठिकाणी भगवान श्रीरामांचे दर्शन घडते. कैलास मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला रामायणातील विविध प्रसंग कोरण्यात आलेले आहेत.

रामायणातील कोणकोणते प्रसंग?राजा दशरथांच्या पाया पडून वनवासात जाण्याची परवानगी घेताना श्रीराम, लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापलेला प्रसंग, सीतेकडे भिक्षा मागताना रावण, सीता हरणाचा प्रसंग, जटायू आणि रावणातील युद्धाचा प्रसंग, वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्धाचा प्रसंग, लंकेकडे जाणारे हनुमान, रावणासमोर बसलेले हनुमान, अशोक वाटिकेत बसलेल्या सीतामाता, रावणाने उचललेला कैलास पर्वत इ. प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत.

वेळ पडतो कमीरामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत. हे प्रसंग जाणून घेण्यास पर्यटक जेवढा वेळ देतील, तेवढा कमीच आहे. त्याबरोबर लेणी क्र. १६ मध्ये शिवाची प्रार्थना करताना श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत.-विवेक पाठक, गाइड, वेरूळ लेणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्याtourismपर्यटन