शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भजन, कीर्तन, इफ्तार चारा छावणीतच; १८ गावांतील शेतकऱ्यांचे महिनाभर हेच घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:03 IST

दुष्काळाच्या दिवसात जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून उभारलेल्या लोणी खुर्द येथील चारा छावणीत तब्बल १८ गावांतील शेतकऱ्यांचे छोटेसे गावच वसले आहे.

- मोबीन खान वैजापूर (जि. औरंगाबाद) : दुष्काळाच्या दिवसात जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून उभारलेल्या लोणी खुर्द येथील चारा छावणीत तब्बल १८ गावांतील शेतकऱ्यांचे छोटेसे गावच वसले आहे. चार हजार जनावरे जगविण्यासाठी आलेली ही मंडळी दुष्काळात नव्या सोबतींमध्ये भजन, कीर्तन अणि रोजा इफ्तारबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी करताना दिसत आहेत.तालुक्यातील डोंगरथडी भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकºयांनी आपली जनावरे जगविण्यासाठी या छावणीचा आधार घेतला आहे. सकाळी जनावरांना चारा-पाणी देण्याचे काम झाल्यानंतर येथे शेतकºयांच्या गप्पांचा फड रंगतो.जनावरांच्या देखभालीसाठी चारा छावणीतच राहत असलेल्या हजारो शेतकºयांची देखभाल संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. त्यांच्यासाठी अल्पदरात वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिलीआहे.चारा छावणीत जनावरांसाठी दररोज ऊस, मका, पेंड आदी खाद्य दिले जाते. दिवसभर कडक ऊन असल्याने उन्हापासून जनावरांना त्रास होऊ नये याकरिता एका संस्थेच्या वतीने ग्रीन शेड नेटचेही वाटप करण्यात आले आहे. जनावरांना संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी संस्थेच्या वतीने खाजगी डॉक्टरांची टीम तैनात आहे.>जनावरांना लेकरासारखं जपलंयजनावरांना लेकरासारखं जपलंय. त्यामुळे ऐन दुष्काळात त्यांना ईकावे वाटंना. लई सरकारं आली अन् गेली, पर शेतकºयांच्या व्यथा काय सुटल्या नायत... अशी व्यथा आहे लोणी खु. येथील शेतकरी गजानन निकम यांची.