शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खोटे जीएसटी नोंदणी असेल तर सावधान; विभागाने सुरु केली तपासणी मोहीम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 17, 2023 19:59 IST

१६ मे ते १५ जुलैदरम्यान जीएसटीचे अधिकारी व्यापारी प्रतिष्ठानच्या जीएसटी नोंदणी क्रमांक व अन्य कागदपत्रांची तपासणी करणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : करचुकवेगिरीसाठी कोणी बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आहे किंवा कोणी शून्य रिटर्न दाखवून कर जमा करीत नसेल, अशा प्रतिष्ठानचा शोध घेण्यासाठी जीएसटी विभाग मंगळवार (दि. १६) पासून शहरात व्यापक तपासणी मोहीम सुरू करीत आहे.

केंद्र सरकारच्या आदेशाने जीएसटी विभागाने करचुकवेगिरी रोखण्यासाठी देशव्यापी मोहीम आखली आहे. १६ मे ते १५ जुलैदरम्यान जीएसटीचे अधिकारी व्यापारी प्रतिष्ठानच्या जीएसटी नोंदणी क्रमांक व अन्य कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही या मोहिमेला सुरुवात झाली असून, संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी तपासणी करणार आहेत. दोन महिने ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

तर होईल फर्म बोगस घोषित...व्यवसाय एका ठिकाणी आणि जीएसटी प्रमाणपत्रातील पत्ता दुसऱ्या ठिकाणचा आढळून आला. तर जीएसटी अधिकारी ती फर्म बोगस असल्याचे घोषित करतील आणि कारवाई करतील.

चार्टर्ड अकाऊंटंटने क्लाइंटला कळविली माहितीचार्टर्ड अकाऊंटंटने त्यांच्याकडील क्लाइंट्सना जीएसटी विभागाच्या तपासणी मोहिमेची माहिती कळविली आहे. आपल्या क्लाइंटकडे सर्व कागदपत्र, जीएसटी प्रमाणपत्र असल्याची ते खात्री करून घेत आहेत. आपल्या प्रामाणिक जीएसटीधारकाला कुठेही काही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.

जीएसटी विभागाचे आदेश१) कारखान्याच्या किंवा दुकानाच्या दर्शनी बाजूस फर्मचा जीएसटी नंबर, पत्ता, नाव असणे आवश्यक.२) जीएसटी प्रमाणपत्र असणे आवश्यक.३) जिथे व्यवसाय चालू आहे तोच पत्ता जीएसटी प्रमाणपत्रावर अपडेट करावा, अन्यथा त्याला ५० हजार रुपये दंड लागेल.४) विक्री आणि खरेदीची बिले असणे आवश्यक आहे.५) व्यवसायाची जागा भाड्याने घेतली असेल तर वैध भाडेपत्र असावे.

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादMarketबाजार