शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पैठण तालुक्यात विहिरी, बोअर घेण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:12 IST

यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.

अंकुश वाघपैठण : यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.तालुक्यात ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर खोदले जात असल्याने जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे. तसेच नवीन विहीर खोदकामासह जुन्या विहिरीतसुध्दा आडवे बोअर मारण्यात येत आहेत. मोजक्या शिल्लक राहिलेल्या फळबागा वाचविण्साठी शेतकरी जीवाचे रान करत असल्याचे तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मागील सलग बारा वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस पडू लागल्यामुळे म्हणावे तसे पाणी जमिनीत मुरले नाही. यंदा तर पावसाचे प्रमाण फारच नगण्य राहिल्याने याचा फटका खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकालाही बसला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.पाणीपुरवठा योजनेवरही परिणामहिवाळ्यात जमिनीत ओलावा राहिला नाही तर आगामी उन्हाळ्याचा विचार न केलेला बरा. ऊस लागवड करणारे शेतकरी पुन्हा संकटात सापडून लागवड केलेला ऊस जगविण्यासाठी धडपड करत आहेत. गतवर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे ऊस पिकासह, मोसंबी, डाळींबाची मोठ्या प्रमाणात लागवड वाढ झाली. जलयुक्त शिवाराचा मोठा गाजावाजा झाला अन् यशही आले. यावर उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली. सलग पडलेल्या दुष्काळामुळे पाणीपातळीत प्रचंड घट झाल्याने ती झिजच भरून निघाली नाही. यावर्षी तर पावसाळा कधी आला, कधी संपला, हे कळलेच नाही. बागा सुकू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी पुन्हा शेतकरी धडपड करत नवीन बोअर घेण्यासह विहिरी खोदण्याचा सपाटा लावत आहेत. परंतु चारशे ते पाचशे फूट खोल बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने दुहेरी खर्च करून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. बोअरवेलधारक खोलीची मर्यादा असलेले नियम धाब्यावर बसवून चार पाचशे फूट खोल बोअर बिनधास्त घालत असून यामुळे जमिनीची चाळणी होऊन धरणीचा समतोल बिघडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी पिके पावसाअभावी शेतकºयाच्या हातातून गेल्याने त्यांची आतापासूनच आर्थिक ओढाताण होण्यास सुरूवात झाली आहे. जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. तालुक्यातील आडूळ, बालानगर, चितेगाव, कडेठाण, पारुंडी येथील ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. बागायती शेतींना पाण्याचे नियोजन करता करता नाकीनऊ येत आहे. तालुक्यात दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फाटका बसत असल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाण्याची टंचाई जाणवत असते.भूजल अधिनियमानुसार कोणतीही व्यक्ती अथवा संस्था विनापरवाना पाण्याचा उपसा करु शकत नाही. बोअर खोदणाºया मशीन व्यावसायिकांना जिल्हाधिकारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे नोंद करणे बंधनकारक केले आहे. मात्र हा नियम कुणीही पाळत नसल्याने जमिनीची चाळणी होत आहे.

टॅग्स :Natureनिसर्गweatherहवामान