शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघात ! दागिने घडविण्यासाठी दिलेले ६० तोळ्यांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 13:01 IST

चौकशी केली, तर तो काही दिवसांपासून गावी गेल्याची माहिती मिळाली.

ठळक मुद्देबंगाली कारागीराचे मोबाइल व घरही बंद शहरातील दोन सराफा व्यापाऱ्यांना गंडविले

औरंगाबाद : शहरातील दोन सराफा व्यापाऱ्यांनी दागिने बनविण्यासाठी दिलेले जवळपास ६० तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाला आहे. सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोने घेऊन दोन्ही सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या कारागिराचा पोलीस शोध घेत आहेत. शेख असदउल्ला शेख लियाकत (हल्ली मु. मोमीनपुरा, मुळगाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे फरार कारागिराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको, एन-३ येथील रहिवासी अजय गोवर्धनदास मेवलानी (४५) यांची कासारी बाजार आणि मुलमची बाजार या दोन ठिकाणी दागिने विक्रीची दुकाने आहेत. ते स्वत:ही दागिने तयार करतात. मागील दीड वर्षांपूर्वी त्यांची व दागिने बनविणारा कारागीर शेख असदउल्ला याच्यासोबत ओळख झाली होती. त्यामुळे मेवलानी हे त्याच्याकडे नेहमी सोने देऊन दागिने बनवून घ्यायचे. चार ते पाच दिवसांनंतर दागिने तयार करून शेख असदउल्ला हा मेवलानी यांना ते आणून द्यायचा. त्यानंतर ठरलेली मजुरी त्याला दिली जायची. ५ मार्च रोजी सायंकाळी मेवलानी यांनी शेख असदउल्ला याच्याकडे सोन्याचे बिस्किट, लगड आणि दुरुस्तीसाठी म्हणून काही दागिने असे एकूण तब्बल ३५ तोळे सात ग्रॅम सोने दिले होते. सोने घेऊन गेल्यानंतर शेख असदउल्ला हा कारागीर मेवलानी यांच्याकडे फिरकलाच नाही. नेहमीप्रमाणे चार-पाच दिवस झाल्यानंतर काही दिवस वाट पाहून मेवलानी यांनी शेख असदउल्ला याला मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाइल बंद होता. त्यामुळे ते मोमीनपुरा भागातील त्याच्या खोलीवर गेले. तेव्हा त्या खोलीला कुलूप लावलेले होते.

मेवलानी यांनी आजूबाजूला चौकशी केली, तर तो काही दिवसांपासून गावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मेवलानी यांनी पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या त्याच्या वडिलांना फोनवरून विचारणा केली. तेव्हा असदउल्ला घरी आला होता; परंतु काही दिवसांपूर्वी तो येथून निघून गेल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेवलानी यांनी बुधवारी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अशाच प्रकारे शहरातील आणखी एका सराफा व्यापाऱ्याचे २३ तोळ्यांचे सोने घेऊन तो पळून गेल्याची घटना समोर आली असून, त्याला क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मुजगुले करत आहेत.

टॅग्स :theftचोरीRobberyचोरीAurangabadऔरंगाबाद