आष्टी : हंगामी वसतिगृहाच्या अनुदानासाठी मुख्याध्यापकाकडून २५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धन्वे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई साबलखेड येथे झाली.अंभोरा जिल्हा परिषद शाळेत श्रीमंत सोनवणे हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी अनिवासी हंगामी वसतिगृहे चालविली जातात. त्याच्या अनुदानापोटी दोन लाख रूपये मंजूर झाले होते. हा धनादेश देण्यासाठी धन्वे यांनी सोनवणे यांच्याकडे ७५ हजार रूपयांची मागणी केली होती. पैकी २५ हजार रूपये ६ मार्च रोजी दिले होते. उर्वरित रकमेसाठी धन्वे यांच्याकडून सोनवणे यांच्याकडे तगादा सुरू होता. सोनवणे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी सापळा लावला. त्यात धन्वे अलगद अडकले. याप्रकरणी आष्टी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (वार्ताहर)
२५ हजारांची लाच घेताना बीईओ चतुर्भुज
By admin | Updated: March 24, 2017 00:06 IST