प्रसाद आर्वीकर , परभणीदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात पावसाळ्यातील अडीच महिने उलटून गेल्यानंतरही केवळ १६ टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. परंतु तरीही पिकांची उगवण झाली नाही. पाणीटंचाईनेही जिल्हा होरपळत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीने जोर धरला. अनेक आंदोलने झाली. शासनाने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाई जाहीर केली असून या अंतर्गत कृषीपंपाच्या वीजबिलात ३० टक्के सवलत, शेतसारा माफ आणि विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नऊ तालुके टंचाईमध्ये मोडतात. परीक्षा शुल्काचा विचार करता जवळपास ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५१३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. दहावी परीक्षेसाठी २४ हजार ७३३ विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी १४ हजार ६७० विद्यार्थी पात्र आहेत. त्यामुळे ३९ हजार ४०३ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. परभणी (शहर)108 68065070परभणी (ग्रा.)56 25621510पूर्णा52 22331284पाथरी34 1413527जिंतूर74 32291604गंगाखेड54 29801754मानवत32 1146905पालम42 14841155सेलू37 19251366सोनपेठ25 959495एकूण513 2473314670दहावी परीक्षेसाठी ३३० रुपये एवढे परीक्षा शुल्क गतवर्षी होते. तर बारावी परीक्षेसाठी प्रात्याक्षिकांसह ४०० रुपये परीक्षा शुल्क होते. याच परीक्षा शुल्काचा आधार घेतला तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे ८१ लाख ६१ हजार ८९० रुपयांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे ५८ लाख ६८ हजार रुपयांचे शुल्क माफ होईल.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत परभणी जिल्ह्यात ८० महाविद्यालाये असून या महाविद्यालयांमधून पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा फायदा पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.४शासनाच्या निकषात परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांने परीक्षा शुल्क माफ होत असून कृषीपंपाच्या वीज बिलात ३० टक्के सवलत दिली आहे.
पन्नास हजार विद्यार्थ्यांना लाभ
By admin | Updated: August 26, 2014 01:59 IST