शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

सुकन्या योजनेतील लाभार्थ्यांच्या गणनेस प्रारंभ

By admin | Updated: August 29, 2014 01:26 IST

हिंगोली : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी सुकन्या योजना अंमलबजावणीच्या टप्प्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोषणा झालेल्या योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी गणना आता सुरू झाली

हिंगोली : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी सुकन्या योजना अंमलबजावणीच्या टप्प्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोषणा झालेल्या योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी गणना आता सुरू झाली असून विभागीय आयुक्तालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. या योजनेच्या घोषणेनंतर जन्मलेल्या व शासन निर्णयातील निकषात बसणाऱ्या मुलीच्या नावावर शासन एका वर्षाच्या आत २१ हजार रुपये गुंतवणार आहे. तर त्या मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबातील दोन मुलींना याचा लाभ मिळणार आहे. तसेच बालगृहातील 0 ते ६ वयोगटातील अनाथ मुली तसेच सहा वर्षांच्या आतील अनाथ मुलीस दत्तक घेणाऱ्या पालकांना याचा लाभ मिळणार आहे. अशा मुलींच्या कमावत्या पालकांचा अपघात विमा उतरविण्याचीही या योजनेत तरतूद आहे. तसेच पहिली ते बारावीपर्यंतच्या मोफत शिक्षणाबरोबर या मुलींना नववी ते बारावीपर्यंत शिक्षा सहयोग शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.महिला व बालकल्याण विभागाकडून १ जानेवारी ते ३१ मार्च २0१४ या कालावधीत जन्मलेल्या मुलींची नावे मागविली आहेत. यासाठी एकूण २६ रकान्यातील माहिती भरून पाठविण्यासाठी प्रपत्र जिल्हा परिषदांना दिले आहे. त्यानुसार संबंधितांची व त्या कुटुंबाची माहिती शासनाला मिळणार आहे. ही माहिती तालुका स्तरावरून मागविण्यात आली असून ती आल्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे. मात्र या योजनेतील निधीबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. (जिल्हा प्रतिनिधी)