शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांची बंंँकेत ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:23 IST

आरमोरी शहरात बँक आॅफ इंडियाची शाखा पंचायत समिती कार्यालयाजवळ आहे. आरमोरी शहराची सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत ४० हजारांवर खातेदार आहेत. मात्र सदर बँकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी येथे ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देपुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव : कर्मचारी, व्यापारी व महिला ग्राहकांनाही तासन्तास करावी लागते प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरात बँक आॅफ इंडियाची शाखा पंचायत समिती कार्यालयाजवळ आहे. आरमोरी शहराची सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत ४० हजारांवर खातेदार आहेत. मात्र सदर बँकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी येथे ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. विशेष करून शासनाच्या विविध योजनेच्या महिला लाभार्थ्यांचीही येथे ससेहोलपट होत आहे.सदर बँक शाखा आरमोरी शहरात एका छोट्याशा भाड्याच्या इमारतीत आहे. येथे ग्राहकांसाठी प्रशस्त व्यवस्था नाही. अपुऱ्या जागेत कॅश काऊंटर, कर्ज विभाग व इतर सर्व कामांचे टेबल ठेवण्यात आले आहे. ग्राहकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. बँकेचा प्रवेशद्वारही अरूंद असल्याने ये-जा करताना ग्राहकांना एकमेकांचा धक्काही लागतो. आता पावसाळा सुरू असल्याने प्रवेशद्वाराच्या बाहेर बँकेचे खातेदार उभे राहू शकत नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एकच कॅश काऊंटर असल्याने खातेदारांची रांग प्रवेशद्वाराच्या पलिकडे असते. सदर बँकेत अधिकाºयांसह एकूण नऊ कर्मचारी आहेत.येथे सहा अधिकारी व सहा कर्मचारी असे एकूण १२ पदे मंजूर आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील तीन पदे रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. ग्रामीण भागातूनही शेकडो खातेदार दररोज या बँक शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. मात्र त्यांनाही चार ते पाच तास काम होण्यासाठी थांबावे लागते. दूरवरून आलेल्या ग्राहकांना घरी जाण्यास सायंकाळचे ७ वाजतात. आर्थिक व्यवहार गतीने होण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुरेसे कर्मचारी नियुक्त करावे. अतिरिक्त काऊंटरची व्यवस्था करावी, शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था करावी, प्रशस्त इमारतीची व्यवस्था करावी, जेणेकरून ग्राहकांची सुविधा होईल, अशी मागणी या बँकेच्या अनेक खातेदारांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सदर बँक शाखेत असुविधांची ही समस्या कायम आहे. अनेक खातेदारांनी माझ्याकडे तोंडी तक्रारीही केल्या. सदर बँक शाखा ही सर्वात जुनी असल्याने ही प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यात व उन्हाळ्यात खातेदारांची गैरसोय होणार नाही. रिक्तपदे लवकर भरण्यात यावी.- भारत बावनथडे, जिल्हा महामंत्री, भाजप, आरमोरी

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडिया