शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गृह विभागाच्या प्रधान सचिवांना खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:11 IST

वक्फ बोर्डातील साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासाठी ‘अ’ वर्ग दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वक्फ बोर्डातील साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासाठी ‘अ’ वर्ग दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.खंडपीठाने राज्याच्या अल्पसंख्याक आयोग व गृह विभागाच्या प्रधान सचिवांसह,औरंगाबादचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओ नसिमबानो पटेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.सातारा (औरंगाबाद) येथील मुस्तफा दिलावर खान पठाण व अंबाजोगाई (जि. बीड) येथील शेख अनिसोद्दीन मझबोद्दीन यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत याचिका दाखल करून वक्फ बोर्डाच्या कामकाजासंबंधी विशेष पथक नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. वक्फ बोर्डाने २०१२ पासून केलेल्या साहित्य खरेदीची सविस्तर चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.संगणक खरेदीसाठी ४८ लाख ९० हजार ७१७ रुपये, झेरॉक्स मशीनसाठी ७५ लाख ७३ हजार ८३९ रुपये, झेरॉक्स मशीनसाठी ६ लाख ६ हजार ६९० रुपये, आॅनलाईन यूपीएससाठी ४४ लाख ८४ हजार २२० रुपये, फ्रॅकिंग मशीनसाठी ४४ लाख ८४ हजार २२० रुपये, प्रिंटर खरेदीसाठी ७ लाख २९ हजार ४९५ रुपये, कार्यालयातील फर्निचरसाठी २९ लाख २५ हजार रुपये, कार्यालयीन स्टेशनरीसाठी १९ लाख ५० हजार रुपये, कार्यालयीन वीज देयके व टेलिफोन बिलासाठी २६ लाख ८ हजार २४९ रुपये मंजूर करण्यात आले होते.प्रत्यक्षात खरेदी न करताच बोगस बिले व व्हाऊचर्स दाखविण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केला. सदर प्रकरणी बोर्डाच्या तत्कालीन सीईओ नसिमबानो पटेल यांनी चौकशी समिती नेमली. त्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीईओ पटेल यांच्यावर आरोप असताना त्यांनी आपल्या खालचे अधिकारी अजिज अहमद सहायक सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. दोषींची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘अ ’ वर्ग अधिकाºयाकडून करण्यात यावी यासाठी शासनास २३ फेब्रुवारी २०१६ मध्ये पत्र देण्यात आले होते; परंतु चौकशी न झाल्याने त्यांनी खंडपीठात अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे मार्फत याचिका दाखल केली आहे.