उस्मानाबाद : दोन महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर १६ जून रोजी पुन्हा जिल्ह्यातील शाळांची मैदाने विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्याचे दिसून आले. आज शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच बहुतांश शाळांत गणवेश व पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत होता. न. प. शाळा उस्मानाबाद : येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. ९ मध्ये मुख्याध्यापिका आर.के. बनसोडे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षक एम.बी. गिरी, एस.ए. वाघमारे, ए.डी. गायकवाड, संगीता उंबरे, शालेय समिती अध्यक्षा सुप्रिया गायकवाड, सुरेखा जेटीथोर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.सांजा प्रशालाउस्मानाबाद : तालुक्यातील सांजा येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिक्षणाधिकारी (प्रा) औदुंबर उकिरडे, गटशिक्षणाधिकारी कल्याण सोनवणे, विस्तार अधिकारी प्रदीप मोकाशे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष भालचंद्र मोहिते, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, रंगनाथ गुरुजी आदींच्या हस्ते मोफत गणवेशाचेही वाटप करण्यात आले. डी.एस. निर्मळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन एस.ए. गजधने, एस.डी. चव्हाण यांनी केले तर आभार आर.एन. कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टी.एन. वनकळस, आर.व्ही. मर्डे, एन.एस. वेदपाठक, एन.ए. नायकल, बी.एस. सूर्यवंशी, एस.एम. पाटील, ए.एम. थोरात, एस.एन. कराड, के.एम. निकम, बी.आर. हुग्गे, एस.के. पवार, आर.एच. धाबेकर, एम.व्ही. मेटे, एस.आर. गलांडे, सबिया शेख, रुकसाना मुलाणी आदींनी परिश्रम घेतले.लिटल स्टार शाळाउस्मानाबाद : येथील लिटल स्टार प्राथमिक शाळेत पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली कडूकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माया दामोदरे, मुख्याध्यापक दीपक भांगे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आर.एस. झोरे यांनी केले. आभार एस.एस. डोके यांनी मानले. किसान विद्यालयउस्मानाबाद : तालुक्यातील पोहनेर येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची ९३ टक्के उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये पताके, आंब्याच्या पानाचे तोरण बांधून व रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली. तसेच मोफत पाठ्यपुस्तकेही वाटप करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी. एस. पोवळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.गुळवेवस्ती जि. प. शाळा उस्मानाबाद : तालुक्यातील गुळवेवस्ती येथील जि.प. प्रा. शाळेत रांगोळी काढून व तोरण बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. यावेळी एस.जी. हुलसुरकर, ए.जी. गरड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.धोत्री जि. प. शाळा तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १६ जून रोजी नवागत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वागत केले. यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप सरपंच अश्विनी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच शिवाजी साठे, राम मस्के, मुख्याध्यापक आर.व्ही. पठाण, आर.सी. भिसे, एस.एस. महामने, एस.पी. ढोणे, आर.के. स्वामी, एस.एन. कोळी, डी.पी. हत्तुरे यांची उपस्थिती होती.तुळजापुरात स्वागततुळजापूर : १६ जून रोजी सुट्या संपून शाळेस प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन होताच त्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. म.वि.रा. शिंदे प्रशालेत मुख्याध्यापक व्ही.पी. वरपे यांच्याकडे इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी शिक्षक कदम, दिलीप गायकवाड आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती. जि.प. शाळा व कन्या प्रशालेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करुन पुस्तकांचे वाटप केले. जिजामाता कन्या प्रशालेत संस्थेचे संचालक अशोक मगर, सचिव व.ग. सूर्यवंशी, मुख्याध्यापिका शशीकला कंकाळ यांनी मुलींचे फुले व खाऊ देवून स्वागत केले. यानंतर पालकांच्या उपस्थितीत पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. कुलस्वामिनी प्रशालेत प्रभारी नगराध्यक्ष गणेश कदम, नगरसेवक पंडित जगदाळे, मुख्याध्यापक उंबरजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुले देऊन पुस्तकांचे वितरण करण्यात आले. लाटे हायस्कूलउस्मानाबाद : येथील भागिरथीबाई लाटे हायस्कूलमध्ये संस्था सचिव पांडुरंग लाटे व ए. आय. जाधवर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. पद्मसिंह पाटील विद्यालयातही पांडुरंग लाटे व मुख्याध्यापिका सी. पी. लाटे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आली.आर्यचाणक्य विद्यालयउस्मानाबाद : येथील आर्यचाणक्य प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच प्रभातफेरी काढण्यात आली. प्रशालेत झालेल्या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय साळुंके, एजाज तांबोळी, मुख्याध्यापिका सुलभा देशमाने, सुरेखा होसिंग, उमाकांत कुलकर्णी, प्रशांत जाधवर आदी उपस्थित होते.बावी आश्रमशाळा उस्मानाबाद तालुक्यातील विद्यानगर (बावी) येथील वसंत प्राथमिक व जवाहर माध्यमिक आश्रम शाळेत नवोगतांचे उत्साही वातावरणात नवगतांचे पुष्प देऊन मुख्याध्यापक दयानंद राठोड, बी. यू. जगताप यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थी, सहशिक्षकांच्या उपस्थितीत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. संचालन बी. एस. साकळे यांनी केले. मराठी कन्या प्राथमिक शाळाउस्मानाबाद : येथील मराठी कन्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक माळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्प व साखर वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. धाराशिव प्रशालाउस्मानाबाद येथील धाराशिव प्रशालेत दिलीपराव गणेश यांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रभातफेरी काढून शाळेत पाठविण्यासाठीचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. एस. जाधव यांनी केले.भाई उद्धवराव प्रशालाउस्मानाबाद येथील भाई उद्धवराव पाटील प्रशालेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेवक चंद्रकांत काकडे, मुख्याध्यापक डी. एम. कुलकर्णी, अलका सुरवसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच परिपाठ घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी हायस्कूलछत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका आर. डी. हुंडेकरी, उपमुख्याध्यापिका पी. एन. चव्हाण यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सरस्वती प्राथमिक शाळाउस्मानाबाद : येथील सरस्वती प्राथमिक शाळेत संस्थाध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निर्मलाताई हुटगी, शारदा राठोड, छाया जाधव, राजेंद्र खैरे, मुख्याध्यापिका विनयाताई मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन साधना बिराजदार यांनी केले. आभार राणी गायकवाड हिने मानले. जि. प. कन्या प्रशालाया शाळेत शालेय समितीचे अध्यक्ष इकबाल पटेल, बागवान आफरीन,मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी आदर्श परिपाठ घेण्यात आला. सूत्रसंचालन एन. डी. तोडकरी यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. व्ही. एन. मक्तेदार यांनी आभार व्यक्त केले. जि. प. प्रशाला मुलांची शाळातुळजापूर येथील जि. प. च्या मुलांच्या शाळेत जि. प. अध्यक्ष सुभाष व्हट्टे,गटशिक्षणाधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत नवागतांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेवक दादासाहेब कंदले, मुख्याध्यापक ए. एस. मसरे, ए.एस. गायकवाड आदींची उपस्थिती होती. लोहारा तालुक्यात स्वागतलोहारा : तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी १७०० नवागतानचे पुष्प देऊन स्वागत करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. शाळांची साफसफाई करून अनेक शाळांना रंगरंगोटी करण्यात आली होती. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६८ शाळा, दोन माध्यमिक शाळा तसेच अन्य ४० खाजगी शाळा आहेत. मुर्शदपूर येथील शाळेत पं. स. सभापती आसिफ मुल्ला, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, विस्तार अधिकारी बी. के. यरमुनवाड, अनंतराव मोरे, प्रकाश गोबाडे, राजाभाऊ झाडपिडे, गिरी महाराज, पवन मोरे यांच्या उपस्थितीत नवोगतांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.लोहारा येथे जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत जि. प. सदस्या मीरा माळी, आशाताई पांढरे, पं. स. सदस्य दीपक रोडगे, संतोष फरिदाबादकर, मीरा जेवळीकर, मल्लीनाथ धोंगडे, सुवर्णा कुलकर्णी, रावसाहेब कांबळे, मुख्याध्यापक व्ही. एस. चंदनशिवे, एस. एम. संदीकर, पी. एस. दबडे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. कै. वसंतराव काळे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मार्डी जि. प. शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंगराव देवकर, मुख्याध्यापक मारुती डोकले, मोहन शेवाळे, रसूल शेख, वर्षा चौधरी, गोकूळ आदटराव, अलकनंदा बिराजदार, अर्चना काटकर आदींनी नवोगतांचे स्वागत केले. अचलेर येथील जि. प. प्रशालेत शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या अरुणा बायस, केंद्रप्रमुख एल. पी. गिराम, सुनील सोमवंशी, कांत पवार, मुख्याध्यापक के. सी. भालके, विकास घोडके, बायस, व्ही. व्ही. सुतार, ए. एल. बाबळे, के. पी. सुतार, जी. एस. स्वामी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ईट जि. प. शाळाईट : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख बिक्कड, मारळकर, मुख्याध्यापक एम.जी. लिंबारे आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सहशिक्षिका मनीषा हुंबे यांनी केले. आभार गिरी यांनी मानले.फुले विद्यालयकळंब : शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनोरमा भवर या होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून गायत्री भांगे, मारुती रणदिवे, माणिक आरकडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. मीनाक्षी भवर, अलका देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापिका भवर यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुधीर भवर, प्रतिभा गांगर्डे, ज्ञानेश्वर तोडकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी केले. आभार सोमनाथ सावंत, परमेश्वर मोरे यांनी मानले.जि.प. प्रा. शाळा आलूरउस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील आलूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती केली. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे पंचायत समिती सदस्य उल्हास घरघरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच गणवेश व पाठ्यपुस्तकांचेही त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद ब्याळीकुळे, माजी अध्यक्ष बब्बे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.डी. अहंकारी यांनी केले. सूत्रसंचालन आर.एस. स्वामी यांनी केले. आभार एस.बी. कवाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.टी. बागवान, एस.एस. घोडके, युसूफ गवंडी, मोहन राठोड, संतोष नवले, प्रदीप डांगे, अरुणा उगिले, कल्पना क्षीरसागर, मुकिंदा गवळी आदींनी परिश्रम घेतले.उमरगा तालुक्यात स्वागतउमरगा : शहर व तालुक्यातील शाळांना आजपासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे गुलाबपुष्प देऊन ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. विविध शाळातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरातील जि.प. प्रशालेत विद्यार्थ्यांना विस्तार अधिकारी ए.बी. शिंगडे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष भारतबाई हराळे, शाकीरा खतीब, सुरेश मडोळ, नंदा गायकवाड, नागिनी शेळके, माजी मुख्याध्यापिका प्रभावती जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. तालुक्यातील एकोंडीवाडी येथील जि.प. प्रा. शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. उद्धवराव पाटील, चतुर राठोड, शिवकुमार बिराजदार, मुख्याध्यापक संजय खंडाळकर, विजय ओवांडकर आदींची उपस्थिती होती. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागतही यावेळी करण्यात आले. तसेच येथील बालाजीनगर जि.प. प्रा. शाळेतही विद्यार्थ्यांना गणवेशाचे व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.जि.प.अध्यक्षांची अचानक भेटउस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील जि.प. प्रा. शाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे व उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी अचानक भेट दिली. तसेच विविध उपक्रमांची पाहणीही केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी ए.एम. कांबळे, मुख्याध्यापक के.व्ही. राठोड, सहशिक्षक डी.एल. सारणे, एच.आर. मोराळे, डी.एच. ढोणे, जी.एम. बळे, यु.ए. साबळे आदींची उपस्थिती होती. आभार बळे यांनी मानले.
घंटा वाजली; शाळा पुन्हा गजबजल्या
By admin | Updated: June 17, 2014 01:13 IST