शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लहरी निसर्गासमोर बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:24 IST

यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत. त्यांना साधा मोबाईल जरी चार्च करायचा असेल तर शहरी ठिकाणी यावे लागत आहे. अशी भयंकर स्थिती निर्माण झालेली असतानाही त्या गावांना अद्याप रोहित्र मिळालेले नाही. त्यातच भयंकर प्रश्न म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे तोंडाशी आलेला घासही जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसाने जमिनीत ओल होती. शिवाय, अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसानेही पाणीपातळी या काळापर्यंत टिकून राहिली होती. त्यामुळेच यंदा रबीच्या क्षेत्रात कमालाची वाढ झाली होती. मात्र केवळ आणि केवळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळेच शेतकºयांना विहिरीत असलेले पाणीही देता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ट्रक्टरवर डायनोमा तयार करुन तीन ते चार विद्युत मोटारी चालवित आहेत. तर बहुतांश शेतकरी डिझेल इंजिनने शेती भिजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे तेही हाती लागते की नाही, याची शाश्वती नाही.लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील ३ ते ४ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पिकांवर याचा परिणाम होत असून सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.या हंगामात फक्त ५२ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आतापासूनच जलस्तर घटत आहे. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत असल्याने या पिकांवर सेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही भागातील कापसावर घाटेअळीही लागली आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक हे सध्या कळी व फुल अवस्थेमध्ये आहे. या पिकांवर शेंगा पोखरणारी हिरवी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी ही अळी रोखण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी सांगितले. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत आहे. त्यामुळे कापसावर मोठ्या प्रमाणावर रोगराई पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभºयावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कसे कराव, याबाबत कृषी विभागाने पत्रके काढून शेतकºयांपर्यंत पोहाचवले आहे. सध्या रब्बीची पेरणी ८० ते ९० टक्के झाली आहे. काही गावात अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. संरक्षित पाणी शेतकºयांनी खरीप व रबीच्या पिकांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या हंगामात ५२ टक्केच पाऊस झाल्याने गव्हाची पेरणी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.