लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्यात यावा, ठिबक सिंचनला १०० टक्के अनुदान देण्यात यावे, शेतमालाला उत्पादन खर्चावर १५० टक्के नफा गृहीत धरून हमी भाव द्या, सर्व शेतकरी व शेतमजुरांना अन्नसुरक्षा द्या, प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य द्या, शेतीतील यांत्रिकीकरणामुळे कमी झालेला रोजगार पुन्हा उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून द्या, सर्व शेतकरी व शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन लागू करा, शेतकऱ्यांनी पाळलेली जनावरे भाकड झाल्यानंतर सरकारने बाजार भावाने विकत घ्यावीत, शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा करा, गोवंश म्हणजे गायी व बैल पाळणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपये अनुदान द्या शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे अशा विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे.या संपाला पाठिंबा देण्यासाठीच सोमवारी राज्यव्यापी बंद करण्यात आला होता. याला बीड जिल्ह्यात व्यापारी, शेतकऱ्यांसह विविध ४० संघटनांनी सहभागी होत हा बंद यशस्वी व शांततेत पार पाडला.
बीड बंद
By admin | Updated: June 6, 2017 00:43 IST