शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मातृ वंदना योजनेत राज्यात बीड अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:16 IST

पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या मातेला या योजनेचा लाभ दिला जातो.

ठळक मुद्दे५० पैकी ४१ गुण मिळविले ३५ गुण मिळवून सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजन प्रभावीपणे राबवून महिलांना लाभ देण्यात बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. ५० पैकी ४१ गुण बीड जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. सांगली जिल्हा द्वितीय तर, अहमदनगर जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी हे गुणांकन करून बीड जिल्ह्याचा शुक्रवारी सन्मान केला.

पुणे येथे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा आढावा डॉ. अर्चना पाटील यांनी घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकुण लाभार्थी, वाटप झालेला निधी आणि कमी त्रुटी आढळल्यामुळे बीड जिल्ह्याला ५० पैकी ४१ गुण मिळाले. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ३६७ लाभार्थ्यांना ११ कोटी ३६ लाख रूपये वाटप करण्यात आले आहेत. बीड पाठोपाठ सांगली ३५ गुण, अहमनगर ३१, भंडारा २७ वा क्रमांक लागतो.

यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कुटूंब कल्याण कार्यालयाकडून या योजनेचा आढावा घेतला जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रथम क्रमांक मिळाल्याने बीड आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यापुढेही विभाग चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. योजना यशस्वी करण्यासाठी सीईओ अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा कार्यक्रम समन्वयक रविंद्र पवळ, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, एएनएम, आशा सेविका परिश्रम घेत आहेत.

काय आहे योजनेचे स्वरूपपहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या मातेला या योजनेचा लाभ दिला जातो. तिने आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून आशा सेविकांकडे वेळच्यावेळी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तीन टप्प्यात या मातेला ५ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यामुळेच राज्यात अव्वल राहिलोत. यापुढेही आमचा अव्वल क्रमांक कायम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू. हे यश  आमच्या टिमचे आहे.- डॉ.आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :Beedबीडgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी