शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या नगराध्यक्षांचे प्रकरण : नगरविकास राज्यमंत्री यांनी तूर्तास कोणताही निर्णय न घेण्याचे अंतरिम आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:02 IST

आ. संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम परवानगी दिल्या. त्यामुळे नगर परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.

ठळक मुद्देपुनर्विलोकन अर्ज राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्याच्या आदेशाविरुद्ध याचिका

औरंगाबाद : बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रकरणात नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी २१ एप्रिलपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी दिला.याचिकेची पुढील सुनावणी २१ एप्रिलला होणार आहे. डॉ. भारतभूषण यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यवाही करण्याबाबतच्या नोटीसविरुद्ध नगरविकासमंत्री यांच्यासमोर दाखल केलेला पुनर्विलोकन अर्ज राज्यमंत्र्याकडे वर्ग करण्याच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

आ. संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम परवानगी दिल्या. त्यामुळे नगर परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन आ. क्षीरसागर यांच्या तक्रारीबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांना नोटिसा देऊन कार्यवाही सुरु केली. या नोटीसविरुद्ध वरील दोघांनी नगरविकासमंत्री यांच्यासमोर पुनर्विलोकन अर्ज दाखल केले.

नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला. २०१२ ते २०१७ या काळात कार्यरत असलेले मुख्याधिकारी आर्थिक नुकसानीस जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानंतर आ. क्षीरसागर यांनी डॉ. भारतभूषण यांना नगराध्यक्ष म्हणून अपात्र घोषित करावे यासाठी नगरविकासमंत्र्यांसमोर अर्ज दाखल केला. त्यांनी तो राज्यमंत्री यांच्याकडे वर्ग करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयाविरुद्ध डॉ. भारतभूषण यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. शासनातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता डी. आर. काळे यांनी काम पहिले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना