लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील अनेक भागात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गूढ आवाज झाला. अचानक आलेल्या आवाजामुळे महिला व बालके भयभीत झाली. हा आवाज कशाचा होता, हे समजू शकले नाही.जिल्ह्यात यापूर्वी अनेकवेळा गूढ आवाज झाले आहेत. प्रामुख्याने गेवराई व आष्टी या भागात असे आवाज झाल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. दरम्यान, बीड शहरात मंगळवारी सकाळी १०.२८ मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे व भांडी कंपन पावली. मोठा स्फोट व्हावा, असा आवाज असल्याने सकाळच्या वेळी घरात काम करणाºया महिलांच्या काळजाचा ठोका चुकला. शाहूनगर, शिंदे नगर, गया कॉलनी, गुरूकुल इंग्लिश स्कूल परिसर या भागासह अन्य ठिकाणी हा गूढ आवाज ऐकू आला.
गूढ आवाजाने बीड शहर हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:28 IST