शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा पाहण्यासाठी पैसे नसल्याने ते बनले दुचाकीचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 10:43 IST

चोरीच्या वस्तू विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पार्ट्या आणि सिनेमा पाहणाºया चौघांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी गेवराईत मुसक्या आवळल्या

बीड : चोरीच्या वस्तू विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पार्ट्या आणि सिनेमा पाहणाºया चौघांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी गेवराईत मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. या टोळीतील तीन आरोपी अल्पवयीन आहेत.संकेत कांडेकर (१८ भिमनगर, गेवराई) व इतर तिघे (१७) अशा चौघांनी चौघांनी शिरूरकासार येथील तीन दुचाकी लंपास केल्या. तसेच गेवराई शहरातील एक मोबाईल शॉपी फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना हे दुचाकीचोर गेवराईतील असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सपोनि दिलीप तेजनकर यांच्यामार्फत गेवराईत सापळा लावला. हे सर्वजण चोरीच्या दुचाकीवरून सिनेमा पाहण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांना गेवराईत बेड्या ठोकण्यात आल्या. शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघड झाल्याने त्यांना शिरूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.सासरा-जावयाची दुचाकी लंपासशिरूर येथे सासºयाकडे धोंडे जेवणासाठी आलेल्या जावयाने आपली दुचाकी रस्त्यावर उभ्ी केली होती. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून या टोळीने या दोघांच्याही दुचाकी पळविल्या होत्या.