शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी डेटलाइन ठरली; औरंगाबादेत कोरोनाच्या दोन कोटी लसींचा साठा करण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:47 IST

corona vaccination : लसीकरणाची मोहीम शासनाच्या आदेशानुसार केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे४ जानेवारीपासून १० जानेवारीपर्यंत विविध टप्प्यांवर वेगवेगळे नियोजन टप्पे कोल्डचेनसाठी ४ जानेवारी रोजी निविदा निघतील.लसीकरण पथकासाठी ५ जानेवारी नियोजन केले जाईल.

औरंगाबाद : कोरोनाच्या लसीकरणाचा पहिला टप्पा येणाऱ्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी प्रशासनाने लसीकरणासाठी डेटलाइन ठरविली असून, दोन कोटी बारा लाख लसींचा साठा कोल्डस्टोअरेजमध्ये करता येईल, एवढी क्षमता प्रशासनाने शासकीय आणि खासगी यंत्रणेमार्फत तयार केल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी केला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, लसीकरणाची मोहीम शासनाच्या आदेशानुसार केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे. शासनस्तरावरून रोज अपडेट घेतले जात आहे. खासगी संस्थांकडे लस साठवणूक करण्यासाठी कोल्डस्टोअरेजची क्षमता जाणून घेतली आहे. तसेच शासकीय यंत्रणेकडे ६ लाख लस साठवता येईल. दोन कोटी १२ लाख लस साठवणुकीच्या तुलनेत ५० टक्के क्षमता जरी जिल्ह्यातील यंत्रणेला उपलब्ध झाली तरी पुढील नियोजन करणे सोपे जाईल. एक कोटी सहा लाख लसींचा साठा आपल्या जिल्ह्यात असेल. कोल्ड स्टोरेज असलेल्या व्यवस्थापनाला दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत. तापमान, कॉम्प्रेसरसह वाहतूक करणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी, अशा सूचना केल्या आहेत.

लसीकरणाची डेटलाइन४ जानेवारीपासून १० जानेवारीपर्यंत विविध टप्प्यांवर वेगवेगळे नियोजन टप्पे डेटलाइन म्हणून ठरविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्डचेनसाठी ४ जानेवारी रोजी निविदा निघतील. लसीकरण पथकासाठी ५ जानेवारी नियोजन केले जाईल. ८ जानेवारी रोजी खाजगी आरोग्य यंत्रणेचा डाटा अद्यावत केला जाईल. १० जानेवारी रोजी व्हॅक्सिन थ्रमिंग केले जाईल, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस