शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

असा हा सुंदर 'गणपतीचा बंगला'... 'या' बंगल्यात नजर जाईल, तिथे बाप्पाच दिसतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:21 IST

श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती, साहित्याचा संग्रह

ठळक मुद्देगणरायाचे सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक छायाचित्रे देशभरातून आणलेल्या १ हजारांपेक्षा अधिक मूर्ती

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : शरणापूर परिसरातील निसर्गरम्य वातावरणातील तो बंगला आता गणपतीचा बंगला म्हणून नावारूपास येत आहे. त्या बंगल्यात नजर जाईल तिकडे गणपतीचेच दर्शन होते. देशभरातील मूर्तिकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आणि गणाधीपतींवरील विपुल साहित्यही येथे आहे. एवढेच नव्हे तर विनायकाला आवडतात तेच फूल, झाड येथील अंगणात लावण्यात आले आहेत. गणपती भक्त, अभ्यासकांसाठी हा बंगला खजिन्यापेक्षा काही कमी नाही. 

न्यायाधीश चारुलता पटेल यांचा हा बंगला. त्यांनी निवृत्तीनंतरचे आपले उर्वरित आयुष्य गणेश भक्तीला समर्पित केले आहे. त्यांनी ही भक्ती धार्मिक कार्यापुरतीच मर्यादित ठेवली नाही. त्यापुढे जाऊन श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती, साहित्याचा संग्रह करणे सुरू केले. देशभरातून आणलेल्या १ हजारांपेक्षा अधिक मूर्ती आज त्यांच्या संग्रहात आहेत. गणरायाचे सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. यात बालगणेशाचे शेकडो छायाचित्रे आहेत. विविध वर्तमानपत्रांत आलेले बाप्पाचे छायाचित्रे, कार्टूनच्या कात्रणांची त्यांनी आकर्षक मांडणी केली आहे. 

याशिवाय १९९० नंतर गणेशोत्सवानिमित्त प्रकाशित विशेष मासिकांचाही संग्रहात समावेश आहे. गणपतीवरील लेख, ग्रंथसंपदा, श्रीगणेश कोश असे विविध धार्मिक ग्रंथही त्यांच्या संग्रही आहेत. तसेच गणपतीच्या गाण्यांच्या शेकडो कॅसेट, सीडी त्यांनी जपून ठेवल्या आहेत. त्यांच्या संग्रहाची ख्याती एवढी झाली की, त्यांचे परिचित जेव्हा देश-विदेशात जातात तेथे त्यांना नवीन आकार, रूपातील गणेशाची मूर्ती दिसली की, ते खास घेऊन येतात व पटेल यांच्या संग्रहाला भेट स्वरूपात देऊन टाकतात. चारुलता पटेल २००४ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्या एवढ्या गणपतीमय झाल्या आहेत की, त्यांचा दिवस गणपतीसोबतच सुरू होतो आणि गणपतीचे ध्यान करीतच त्या झोपी जातात. त्यांनी आपल्या बंगल्यालाही ‘दूर्वांकुर’ असे नाव दिले आहे. 

बंगल्याच्या अंगणात चोहोबाजूने त्यांनी झाडे लावली आहेत. ती सर्व गणरायाला आवडणारीच आहेत. गणेशमूर्तींना तर त्या पोटच्या मुलासारखे जपतात. बंगल्याच्या समोरील बाजूस त्यांनी स्वखर्चाने दूर्वांकुर गणपतीचे मंदिरही उभारले आहे.  यासंदर्भात त्यांनी सांगितले की, मी गणपती भक्त होतेच, पण १९८२-८३ मध्ये रेल्वेतून प्रवास करीत असताना ५ रुपयांचे एक पुस्तक विकत घेतले. त्यात महाराष्ट्रातील १०८ गणपतींची माहिती होती. ते पुस्तक वाचून मला विविध ठिकाणची गणपती मंदिरे बघण्याचा व मूर्ती संग्रहित करण्याचा छंद लागला. आज माझे आयुष्यच गणपतीमय होऊन गेले आहे. गणपतीचे विपुल साहित्य आज माझ्या संग्रहात आहे. गणपती अभ्यासकांसाठी किंवा पीएच.डी. करणाऱ्यांसाठी हे संग्रहालय माहितीचा खजिनाच आहे. 

दूर्वांकुर गणेश संग्रहालय चारुलता पटेल यांनी सांगितले की, या बंगल्याचे रूपांतर भविष्यात दूर्वांकुर गणेश संग्रहालयात करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आराध्यदैवत गणरायाबद्दल अशी विपुल माहिती असलेले स्वतंत्र संग्रहालय कुठेच नाही. गणेश अभ्यासक, भक्तांसाठी हे संग्रहालय सदैव खुले राहणार आहे. त्यादृष्टीने आता आखणी व नियोजन सुरू केले आहे. 

मूर्तीचे विसर्जन नाही : चारुलता पटेल म्हणाल्या की, दरवर्षी गणेशोत्सवात विविध रूपांतील गणेशमूर्तींची स्थापना करते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी थोडे पाणी शिंपडून मूर्ती हलविते व ती संग्रहालयात ठेवते. तिचे विसर्जन करीत नाही. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव