शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

टुमदार इमारती; सुविधांचे सँडविच

By admin | Updated: August 8, 2016 00:28 IST

औरंगाबाद : राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांमध्ये एकच शहर विकास नियंत्रण नियमावली ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने शनिवारी घेतला.

औरंगाबाद : राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांमध्ये एकच शहर विकास नियंत्रण नियमावली ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने शनिवारी घेतला. तब्बल १५ मजल्यांची टुमदार इमारत उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी टीडीआर, पेड एफएसआयचा आधार घेण्यात आला आहे. शहरी विकासाला नवीन गगन भरारी देणारा हा निर्णय असला तरी नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा देताना महापालिकांचा सँडविच होणार हे निश्चित. शासन निर्णयावर ‘कहीं खुशी तर कहीं गम’अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील सर्व ड वर्ग महापालिकांमध्ये विकास नियमावली एकच असावी, यासंदर्भात दोन ते तीन वर्षांपासून अभ्यास सुरू केला होता. ज्यावेळी अभ्यास सुरू होता तेव्हा औरंगाबाद महापालिका ड वर्गात होती. नंतर महापालिकेचे प्रमोशन झाले. ‘आपली’ महापालिका आता क वर्गात पोहोचली आहे. ड आणि क वर्गाच्या महापालिकांसाठी विकास नियमावलीत किंचित फरक आहे. त्यामुळे विकास नियमावलीत वर्गवारीचा फारसा फरक पडत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रत प्राप्त झाल्यावर त्यावर अधिक बोलणे योग्य राहील, असेही काहींनी नमूद केले.औरंगाबादेत पूर्वी आठ मजली इमारत उभारण्याची मुभा होती. शासन निर्णयानुसार आता १५ मजले उभारता येतील. टीडीआर, एफएसआय आणि पेड एफएसआय वापरून उंच इमारती उभ्या राहतील. शासनाने या नियमावलीला मान्यता देताना मॉल संकल्पना, मल्टीप्लेक्स आदी बाबी डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. कारण भविष्यात शहरीकरणाचा हा अविभाज्य घटक असेल. टीडीआरसंदर्भात शासनाने वेळोवेळी नियमावलीत बदल केला आहे. आता नवीन धोरण काय आहे, हे शासन निर्णय पाहूनच सांगता येईल, असेही काही तज्ज्ञांनी नमूद केले.महापालिकांवर ओझे वाढणारविकासाला चालना देण्यासाठी शासनाने उंच इमारती उभारण्यास मुभा दिली असली तरी छोट्या महापालिकांची बरीच गळचेपी होणार आहे. बिल्डर मंडळी उंच इमारती बांधून मोकळे होतील. तेथे राहणाऱ्या नागरिकांना रस्ते, ड्रेनेज, पाणी या सोयी-सुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर येईल. आज औरंगाबाद शहराला पाण्याची गरज २३५ एमएलडी आहे. दोन दिवसांआड महापालिका फक्त १४० ते १५० एमएलडी पाणीच देऊ शकते. शहरात ५० मीटरपर्यंत टुमदार इमारती उभ्या राहिल्यास महापालिकांचे अक्षरश: सोयी-सुविधा पुरविण्यात सँडविच होणार आहे.चित्र अजूनही अस्पष्टशनिवारी शासनाने नेमका काय निर्णय घेतला हे अजून समजायला मार्ग नाही. अध्यादेश निघाल्यावर त्यावर अधिक भाष्य करणे योग्य राहील. औरंगाबादेत एफएसआय १.३ करावा, अशी असोसिएशनची मागणी होती. नगररचना संचालकांनी तो शासनापुढे १.१ म्हणून ठेवला. पूर्वी प्रिमियम घेऊन काही बांधकाम नियमित करून देण्यात येत होते. आता त्यासाठी काय नियम केले. ६ मीटर, ७.५ मीटर रोडवर टीडीआर नको, असे वास्तूविशारद संघटनेचे मत होते. ९ मीटरला आम्हीसुद्धा हिरवी झेंडी दाखविली होती. अध्यादेशात काय मंजूर आहे, हे लवकरच कळेल.अजय ठाकूर, वास्तूविशारद