शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीट मार्शल आणि वाहतूक हवालदाराला धक्काबुक्की

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

औरंगाबाद : ड्यूटीवर कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याच्या घटना गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.

औरंगाबाद : ड्यूटीवर कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याच्या घटना गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या प्रकरणी जिन्सी आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.भांडण सोडविणाऱ्या बीटमार्शलला धक्काबुक्कीजिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष तुकाराम पारधे हे गुरुवारी रात्री १०.५५ वाजेच्या सुमारास बीट मार्शल म्हणून गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना नागसेन कॉलनी येथे भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. ते तेथे पोहोचले आणि भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागले. त्यावेळी आरोपी सलीम कुरेशी रज्जाक कुरेशी (रा. नागसेन कॉलनी) याने पारधे यांनाच भांडण सोडविण्यासाठी कशाला आला, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.तेव्हा त्यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पारधे यांचीच गच्ची पकडून लोटालोट केली, त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेची माहिती पारधे यांनी वरिष्ठांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.या प्रकरणी पारधे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सलीम कुरेशीविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत रिक्षाचालकाची हुज्जतवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरोधात कारवाई करीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलसोबत रिक्षाचालकाने चांगलीच हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केल्याची घटना गारखेडा परिसरातील गजानननगर येथे घडली.शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल अविनाश महादेव ढगे हे गजानननगर भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत होते. त्यावेळी रिक्षा क्रमांक एमएच-२०, बीटी ७५११ हा तेथून जाऊ लागला.यावेळी पोलिसांनी रिक्षाचालक गौतम आबाजी वाहूळ (४५, रा. जयभवानीनगर) यास थांबविले असता त्याने आपली रिक्षा थेट पोलिसांच्या टू मोबाईल वाहनासमोरच सिनेमास्टाईलने उभी केली. यावेळी त्याने मोठ्यमोठ्याने आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कॉन्स्टेबल ढगे यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली.यावेळी ढगे यांच्यासोबत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेऊन मुकुंदवाडी ठाण्यात नेले. त्याच्याविरोधात ढगे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कसबे करीत आहेत.