शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग़

By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST

शिरीष शिंदे , बीड शहरातून जाणारा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूमार्ग ठरत आहे़ या महामार्गावर दररोज तीन ते चार अपघात होतात, असे आकडेवारीतून समोर आले आहे़

शिरीष शिंदे , बीडशहरातून जाणारा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूमार्ग ठरत आहे़ या महामार्गावर दररोज तीन ते चार अपघात होतात, असे आकडेवारीतून समोर आले आहे़ मागील सहा वर्षामध्ये महामार्गावर सुमारे ३७०६ इतके अपघात झाले आहेत़ बळींची संख्या १८३७ इतकी आहे़ त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाय महत्वाचे आहेत़जिल्ह्यातून दोन महामार्ग जातात़ धुळे-सोलापूर व कल्याण-विशाखापट्टणम् या महामार्गांचा समावेश आहे़ पैकी धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग सर्वाधिक अपघात प्रवण ठरत आहे़ बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक परिसर, अण्णा भाऊ साठे पुतळा हे भाग सकाळी गर्दीने फुलून गेलेले असतात. सिग्नल संपले तरी वाहनांची रांग काही संपत नाही, अशी स्थिती आहे़ मिनिटाला दहा जड वाहने या महामार्गावरून जातात़ बीड शहरातील साठे चौकामध्ये एकाच दिवशी दोन पोलिसांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना तीन वर्षापूर्वी घडली होती़ त्यानंतर आणखी पाच जणांचे तेथे बळी गेले़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील चौकही अतिशय धोकादायक ठरतो आहे़ तेथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह मुख्याध्यापकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत़उड्डाणपूल, बायपासला विलंब का?बीड शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे़ बायपासचे कामही धिम्या गतीने सुरू आहे़ ही दोन कामे झाली तर अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचतील़ त्याचबरोबर शहराचे वैभव वाढणार आहे़; परंतु हे दोन्ही प्रश्न सोडविण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजयुमोचे शहराध्यक्ष शेख फारूक यांनी केला़ आणखी किती बळी जाणार आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे़भाजी मंडईतील रस्ते अरूंद आहेत़ लगतच शाळा आहे़ त्यामुळे विद्यार्थी, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची कायम गर्दी असते़ येथे जड वाहनांना दिवसा प्रवेशास बंदी आहे़ मात्र मालवाहतूक करणारे ट्रक सर्रास ये-जा करतात़ याकडे वाहतूक पोलिसांचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ जड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते शिवाय अपघातालाही निमंत्रण मिळते़ हातगाडे, छोटे विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडतात त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते़ जड वाहनांवर कारवाया सुरू आहेत, असे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक एम़ ए़ सय्यद यांनी सांगितले़