शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

शिवरायांच्या जयघोषाने बीड दुमदुमले

By admin | Updated: February 20, 2015 00:11 IST

बीड : ‘जय भवानी, जय शिवाजी’, छत्रपती शिवाजी महाराज की जय... या गगनभेदी घोषणांनी बुधवारी संपूर्ण जिल्हा दणाणून गेला.

बीड : ‘जय भवानी, जय शिवाजी’, छत्रपती शिवाजी महाराज की जय... या गगनभेदी घोषणांनी बुधवारी संपूर्ण जिल्हा दणाणून गेला. घोडे, उंटांसह निघालेल्या भव्य मिरवणुका... लेझीम- झांज पथके, पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे... अशा मराठमोळ्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली. बीडमध्ये सिंहासनाधिष्टित शिवाजी महाराजांची भव्यदिव्य मूर्ती व गड किल्ल्यांच्या हुबेहूब चित्रकृती हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. जयंतीचे औचित्य साधून जिल्हाभर मिरवणुका, व्याख्यान, अभिवादन कार्यक्रम आयोजित केले होते. काही मंडळांनी सामाजिक उपक्रमांची जोड देऊन जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विद्युतरोषणाईबरोबरच सजावट केली होती. सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते, नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी अभिवादनासाठी रीघ लावली होती. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दुपारी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. जि. प. सभापती संदीप क्षीरसागर, उत्सव समिती अध्यक्ष रविराज गायके, अरुण डाके, गंगाधर घुमरे, विलास बडगे, दिनकर कदम, बळीराम गवते, हेमंत क्षीरसागर, पवन तांदळे, अमर नाईकवाडे, भारत सोन्नर, शाहेद पटेल, युवराज बहिरवाल, परमेश्वर सातपूते, अशोक जाधव, विनोद इनकर, झुंजार धांडे, अशोक रोमण, किशोर पिंगळ, रोहित गुजर, बाळासाहेब गुंजाळ आदी सहभागी होते. सुभाष रोड, साठे चौक, जालना रोडवरुन मिरवणूक शिवाजी चौकात पोहोचली. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.स्वाभिमानी युवा ब्रिगेडकडून स्वच्छता मोहीमस्वाभिमानी युवा ब्रिगेडतर्फे ‘शिवगर्जना’ हे महानाट्य येथे घेण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने बुधवारी होणारी मिरवणूक रद्द केली होती. शिवगर्जना महानाट्याच्या परिसरात युवा ब्रिगेडच्या वतीने बुधवारी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, समितीचे अध्यक्ष कैलास नलावडे, अजित कुडके, शहाजी वरवट, संतोष जाधव, रईस चाऊस, महेंद्र सारडा, अनूप मंत्री, अ‍ॅड. आनंद पाटील उपस्थित होते.गेवराईत दुचाकी रॅलीगेवराई येथे जयंतीनिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवाजी चौकामध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)गळ्यात भगवे रूमाल, डोक्याला फेटे, हातात झेंडे आणि मुखात जय शिवरायचा जयघोष यामुळे संपूर्ण शहर गुरुवारी भगवेमय झाले होते. लेझीम, ढोलताशांनी मिरवणुकांत रंग भरला. ४तरुणांच्या झुंडीच्या झुंडी दुचाकी व पायी मिरवणुका काढून पुतळ्याकडे जात होत्या. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या विविध देखावे सादर करण्यात आले होते. सामाजिक संदेश देणारे फलकही दिसून आले.४खास पुण्याहून ढोल ताशा पथक मागविले होते. महिला झांज पथक, लेझीम पथकाने सर्वांच्याच काळजाचा ठाव घेतला. ६५ मुला- मुलींचा यात सहभाग होता असे, पथक प्रमुख वैशाली मराठे यांनी सांगितले.या मिरवणुकीत लेझीम पथकही सहभागी झाले होते. येथील यशोदीप गुरूकुलमधील चिमुकल्यांनी लेझीम खेळून बीडकरांचे लक्ष वेधुन घेतले. संचालक विजय गिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मिरवणुकीतील दोन घोडे हे ठिकठिकाणी बाजावर नृत्य करीत होते. गोल-गोल फिरून नृत्य करणारे हे घोडे पाटोदा येथून आले होते. पाहण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होती.काही युवक, युवतींनी मिरवणूक पहात असताना मोबाईलमध्ये फोटो व व्हीडिओ टिपण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी तर लगेच आपला फोटो व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवर पोस्ट केला. परळी येथे शिवजंती उत्साहात साजरी झाली. शिवाजी महाराजांच्या जयघोषात मिरवणुका निघाल्या. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाआधी चबुतऱ्याचे पूजन नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. वैजनाथ सोळंके, राजेश विभूते, संजय सुरवसे, शिवाजी देशमुख उपस्थित होते. राजे मित्रमंडळ, अंबेवेस मित्रमंडळाच्या मिरवणुकांतील घोडेस्वार, बँडपथकाने लक्ष वेधले. राजेश देशमुख, प्रसाद महाजन, विक्रम देशमुख, अनिकेत तिळकरी, दत्ता देशमुख, शशीकांत शास्त्री, मुन्ना बारस्कर, अमोल कुलकर्णी, दत्ता फुलारी, जीवन नानावटे आदी सहभागी होेते. शिवसंग्रामच्या वतीने तुळशीराम पवार यांच्या पुढाकारातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा शिवप्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सुभाष नानेकर, डॉ. राजाराम मुंडे, उमा समशेटे, दत्तात्रय काळे, मोतीराम चव्हाण यांचा समावेश आहे. व्याख्यान कार्यक्रमही झाला.