शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परजिल्ह्यातील रुग्णांसाठी तयारीत राहा, प्रशासनाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 18:11 IST

Corona Virus : मराठवाड्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मायक्रो प्लानिंग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यात ऑक्सिजनसाठी सुक्ष्म नियोजनविभागीय प्रशासनाने सहा जणांची कोअर टीम केली स्थापनऔरंगाबाद शहरात मराठवाड्यासह इतर ठिकाणांहून २५ टक्के रुग्ण उपचारांसाठी येतील

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याच्या आणि डेल्टा प्लसचे रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणेने आतापासूनच नियोजनास सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरात मराठवाड्यासह इतर ठिकाणांहून २५ टक्के रुग्ण उपचारांसाठी येतील, हे गृहीत धरूनच तयारी ठेवावी, अशा सूचना विभागीय प्रशासनाने यंत्रणेला केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १३ जिल्ह्यातील सुमारे दोन हजार रुग्ण औरंगाबादेत उपचारासाठी होते. संभाव्य तिसऱ्या लाटेतदेखील औरंगाबादेत जास्तीचे रुग्ण येऊ शकतात, अशी शक्यता प्रशासनाला वाटते आहे.

मराठवाड्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मायक्रो प्लानिंग करण्यात येत आहे. विभागीय प्रशासन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन वेळा तरी ऑनलाईन बैठक घेत सूचना करीत आहे. सर्व जिल्ह्यांतील ऑक्सिजनची सद्य:स्थिती, पुरवठ्यासाठीचे प्रयत्न, रोजची संभाव्य गरज तपासली जात आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसाठी पुरवठा करताना प्रचंड तारांबळ झाली. शिवाय विभागीय प्रशासनाला चाकण, रायगड येथील यंत्रणेशी वाद घालावे लागले. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ऑक्सिजन रुग्णांना दिले गेले. त्याचे ऑडिट केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्रुटींचा विचार करण्यात आला. असा सगळा प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होऊ नये, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या आहेत. हिंगोली, नांदेड, परभणीतील नियोजन बऱ्यापैकी आहे. जालना, बीड आणि उस्मानाबाद व औरंगाबादमध्ये नियोजनासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. लातूरमध्येही तशीच परिस्थती आहे.

असे करा नियोजनपाच हजार सिलिंडर विभागात दररोज लागतील, असे गृहीत धरण्यात यावे. त्यातच दोन हजार सिलिंडर स्टॉकमध्ये असतील, याचा विचार करावा. उरलेले तीन हजार सिलिंडरपैकी एक हजार वाहतुकीत असतील, एक हजार हॉस्पिटलमध्ये, तर एक हजार फिलिंग स्टेशनवर असतील, असा विचार करावा. जर या पद्धतीने मायक्रो प्लानिंग केले, तर दुसऱ्या लाटेत जो त्रास झाला तसा होणार नाही अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या आहेत.

सहा जणांची कोअर टीम केली स्थापनमराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यास दीडपट रुग्णसंख्या असेल, हे गृहीत धरून नियोजन करण्यासाठी विभागात सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्थापन केली आहे. महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त वीना सुपेकर, जगदीश मिनीयार, अविनाश पाठक, शिवाजी शिंदे आणि रश्मी खांडेकर यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. प्राधान्याने बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा यावरच ही टीम लक्ष देत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद