शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! ज्येष्ठ नागरिकाला पाचशेच्या बंडलात आली पाचची नोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:42 IST

पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नोट घालून बँक आॅफ महाराष्ट्रच्या शहर शाखा क्र. ३२, चौराहा येथील बँक कर्मचाऱ्याने आपली फसवणूक केल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक सुभाषचंद्र वानखेडे यांनी केला. 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नोट घालून बँक आॅफ महाराष्ट्रच्या शहर शाखा क्र. ३२, चौराहा येथील बँक कर्मचाऱ्याने आपली फसवणूक केल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक सुभाषचंद्र वानखेडे यांनी केला. 

निवृत्तीवेतनधारक सुभाषचंद्र वानखेडे यांचे खाते बँक आॅफ महाराष्ट्राच्या चौराहा शाखेत आहे. त्यांना सहलीला जायचे असल्यामुळे ते पैसे काढण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी बँकेत गेले. तेथे त्यांनी ५० हजार रुपयांची विड्रॉवल स्लीप भरली आणि पासबुकसह कॅशिअरकडे दिली. यानंतर कॅशिअरने त्यांना विड्रॉवल पास करण्यासाठी वरच्या अधिकाऱ्याकडे पाठविले. या कामासाठी त्यांना ८ ते १० मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर टोकन क्र मांक आल्यावर वानखेडे पैसे घेण्यासाठी काऊंटरवर गेले.

त्यांना देण्यासाठी कॅशिअरने १०० रु. च्या १०० नोटा याप्रमाणे १० हजार दिले आणि ५०० रुपयांच्या ८० नोटा असलेले ४० हजारांचे बंडल दिले. कॅशिअरने मशीनवर नोटा मोजून दिल्या आणि त्या नोटा किती आहेत, याचा आकडा मशीनवर नीट पाहून घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार वानखेडे यांनी केवळ आकडा पाहिला आणि काऊंटर सोडले.

त्यानंतर ते २० दिवसांची सहल पूर्ण करून घरी परतले. झालेला खर्च आणि उरलेले पैसे याचा ताळमेळ करण्यासाठी त्यांनी ते पाचशेच्या नोटांचे बंडल काढले असता त्यांना पाचशेच्या नोटांमध्ये पाच रुपयांची एक नोट आढळून आली. सदर प्रकार बँक कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वानखेडे दि. २२ मार्च रोजी पुन्हा बँकेत गेले व कॅशिअरला भेटून सविस्तरपणे माहिती दिली; पण असा प्रकार होऊच शकत नाही, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. हातचलाखी करून बँक कर्मचाऱ्याने आपली ४९५ रुपयांची फसवणूक केली आहे, असा दावा वानखेडे यांनी केला आणि  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शिताफीने चिकटवली नोटपाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नवी कोरी नोट मोठ्या शिताफीने टाकलेली दिसून आली. नोट मोजण्याच्या यंत्रामध्ये पाचशेच्या नोटांबरोबर ही नोट बरोबर मोजली जावी यासाठी पाचच्या नोटेला किंचितसा डिंक लावून ती पाचशेच्या नोटेला हलकीशी चिकटविण्यात आली अणि एका विशिष्ट पद्धतीने तिची घडी घातलेली दिसून आली. ‘लोकमत’ प्रतिनिधीतर्फे सदर प्रकार नोट मोजणी यंत्रावर तपासून पाहिला. हे यंत्र केवळ खोट्या नोटा बाजूला काढून टाकत असल्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये पाच रुपयाची नोट अगदी सहजपणे मोजली गेल्याचे दिसून आले. 

एटीएम मशीनमध्येही निघाली अशी नोटकाही दिवसांपूर्वी एका बँकेच्या एटीएममधूनही पाचशे रुपयांच्या नोटेला चिकटवलेली पाच रुपयांची नोट आल्याचा प्रकार नागरिकांनी सांगितला.

सखोल चौकशी करूसदर प्रकाराविषयी ग्राहकाने केलेल्या तक्रारीची माहिती अजूनपर्यंत माझ्याकडे आलेली नाही. जेव्हा ही तक्रार माझ्यापर्यंत येईल तेव्हा शक्य तितक्या लवकर झालेल्या घटनेची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्यात येईल. - सुधीर वाजपेयी, सहायक महाव्यवस्थापक

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद