शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! येथे धोका आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:37 IST

बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान!

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान! बिंदुसरा नदीवरील असणाऱ्या पुलावर धोका आहे. कारण, हा पूल धोकादायक आहे, तर पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने येथे अपघाताची दाट शक्यता आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ आहेत. दरम्यान, याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसणार, हे निश्चित.उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यासाठी अगदी कमी अंतरात सोयीचा असणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरुन दररोज २० हजारांवर वाहने ये-जा करतात. याच महामार्गावर शहरातून जाणारी बिंदुसरा नदी आहे. या नदीवरील पूल १९३८ साली ब्रिटिशांनी बांधला होता. सुरुवातीला या पुलाची रुंदी ५.५ मीटर एवढी होती. १९८८ मध्ये या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात दोन्ही बाजूंनी ४ गर्डर नव्याने बांधण्यात आले. त्यामुळे या पुलाची रुंदी ७.५ मीटर झाली. हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ४ मे २०११ रोजी झाला होता; मात्र प्रत्यक्षात जून २०१४ मध्ये त्याची अंमलबजावणी झाली.तेव्हापासून आजपर्यंत या पुलाची केवळ डागडुजी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले. गतवर्षी महाडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. आयआरबीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ८ आॅगस्ट २०१६ रोजी याची पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय गुणवत्ता तपासणी पथकाने या पुलाची पाहणी केली. यामध्ये हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या पुलावरून अवजड वाहनांसाठी होणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे सोलापूरकडे जाणारी अवजड वाहने पाटोदामार्गे वळविण्यात आली. याचा फटका म्हणजे त्यांना ९० किलोमीटर अंतर जास्त कापावे लागले. यामध्ये त्यांना इंधनाचा अधिकचा भुर्दंड व वेळ खर्ची करावा लागला होता. वाहनधारकांच्या या त्रासाची कुणीही दखल घेतली नाही, हे विशेष.कमी उंचीमुळे पर्यायी पूलही धोकादायक !गतवर्षी झालेल्या पावसात बिंदुसरा नदीला पूर आल्याने ब्रिटिशकालीन पुलावरूनही पाणी वाहले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याने तो यावर्षी बंद करण्यात आला. त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून बाजूने केलेल्या रस्त्याची उंची अतिशय कमी असल्याने याला पावसाळ्या धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.