शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! औरंगाबाद - नाशिक बस प्रवासामध्ये सक्रिय आहे महिला चोरांची टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:49 IST

एशियाड बसमधून रोख रक्कम व दागिन्यावर हातसाफ करून गारज बसस्थानकावर उतण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार महिलांना देवगांव रंगारी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मागील काही दिवसात बसप्रवासात मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वैजापुर (औरंगाबाद ) : एशियाड बसमधून रोख रक्कम व दागिन्यावर हातसाफ करून गारज बसस्थानकावर उतण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार महिलांना देवगांव रंगारी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मागील काही दिवसात बसप्रवासात मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी औरंगाबादहुन नाशिककडे जाणाऱ्या एशियाड बसमध्ये नगर नाक्यावरून चार महिला बसल्या. देवगांव ते गारज या दरम्यान त्यांनी शिऊर येथील एका महिलेच्या बॅग मधून पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. याचा संशय आला असता त्या महिलेने गारज येथील बसस्थानकावर बस थांबवली. ग्रामस्थांच्या मदतीने त्या चार महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले पाच हजार सापडले. यानंतर घटनेची माहिती देवगांव रंगारी पोलिसांना दिली असता त्यांनी गरज येथून चारही महिलांना ताब्यात घेतले. या चारही महिला कोपरगाव (जिल्हा अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शिऊर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धुळे येथील महिला चोरांची टोळी बसमध्ये पकडल्याची माहिती यावेळी पोलिस उपनिरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.

धुळे, कोपरगाव येथील टोळी  गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद ते वैजापुर मार्गे जाणाऱ्या बसमध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय आहे. प्रवासात त्यांचे वागणे व पेहराव पाहून त्यांच्याबद्दल कोणालाही शंका येणार नाही. मात्र ही एक महिला चोरांची टोळी आहे. बसमध्ये या टोळीने सध्या धुमाकूळ घातलाय. दिवसाढवळ्या प्रवासाच्या निमित्ताने ही टोळी मौल्यवान वस्तूंवर हातसाफ करत आहे. प्रवाशांना बोलण्यामध्ये गुंतवून त्या मोठ्या शिताफीने रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरतात. यात मुख्यत: धुळे व  कोपरगावातील महिला चोरांची टोळी सक्रीय आहे.  

टॅग्स :Thiefचोर