हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा मैदानावर विधिवत बासापूजनाने दसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला.पूजन महंत कमलदास महाराज यांच्या हस्ते झाले. तर गोपाललाल मंदिराऐवजी ते मैदानावरच केले.या पूजेसाठी खा.राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कासार म्हणाले, दसरा महोत्सवासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. दसऱ्याचे थेट केबल प्रक्षेपण नेटवर्कद्वारे करून घराघरात ते दाखविले जाईल, असे सांगितले.खा. राजीव सातव म्हणाले, हिंगोलीचा दसरा महोत्सव खरोखरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, इंटरनेट आदीचा वापर करावा. महोत्सवाला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन केले. तर आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी महोत्सव आयोजनासाठी सदैव जनतेच्या सोबत असल्याचे सांगून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.रमेशचंद्र बगडिया, शांतीलाल जैन, कमलकिशोर काबरा, ओम बियाणी, सुभाष लदनिया, नंदकिशोर तोष्णीवाल, कांता गुंडेवार, अॅड. साहेबराव पडोळे, शरद जयस्वाल, अॅड. सीताराम राठोड, विलास गोरे, सदाशीव सूर्यतळ, विश्वास बांगर, ज्ञानेश्वर जाधव, चंदू लव्हाळे, राधेश्याम पंडित, मोती महाराज, प्रकाश बांगर, बाबा घुगे, गणेश साहू, राजू उपाध्ये, एम. एम. देशमुख, आबेदअली जहागिरदार, तलाठी दराडे गणेश साहू, विश्वास नायक, गोपाल अग्रवाल आदी उपस्थित होते. पारंपरिक बासापूजनानंतर आता विविध मूर्ती तयार करण्यास प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)
बासापूजनाने दसरा महोत्सवाची तयारी सुरू
By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST