भारत दाढेल, नांदेडबापट आयोगाचा अहवाल क्रमांक १३ हा आंतरविरोधी असून सामाजिक संशोधन केंद्राने केलेले वर्णन एका जागी तर दुसऱ्या जागी त्याच विषयासंबधी दुसरे निवेदन आढळते़ त्यामुळे घिसाडी समाजावर अन्याय झाला आहे़ हा आंतरविरोध जाणून घेण्यासाठी शासनाने घिसाडी समाजातील सुशिक्षितांच्या प्रतिक्रिया घेऊन निराकरणाची लेखी नोंद करावी, अशी मागणी घिसाडी समाजाचे विचारवंत डॉ़ ईश्वर पवार यांनी केली़ महाराणा प्रताप घिसाडी - गाडी लोहार समाज बहुद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत माजी न्यायमूर्ती आऱ एम़ बापट यांच्या मार्गदर्शनाखालीलील नेमलेल्या आयोगाच्या शिफारशीवर आक्षेप घेण्यात आला आहे़ यासंदर्भात संघटनेचे डॉ़ पवार यांनी येथे लोकमतशी बोलताना सांगितले, बापट आयोगाच्या अहवाल क्रमांक १३ विरूद्ध आम्ही शासनाला निवेदन सादर केले आहे़ घिसाडी समाजाला व गाडीलोहाराला एकाच प्रवर्गात (एनटी ब), (भटक्या जमाती ब) समाविष्ठ केले आहे़ त्यामुळे घिसाडी समाज अंसतुष्ट झाला आहे़ गाडीलोहार (बलुतेदार ) वतनदार तर घिसाडी लोहार (अलुतेदार) भटका आहे़ गाडीलोहार आर्थिकदृष्ट्या सक्षम व लोकसंख्येने अधिक आहे़ तर घिसाडी समाज लोकसंख्येने कमी व आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे़ असे असताना घिसाडी समाजाला व गाडीलोहाराला एकाच प्रवर्गात समाविष्ट करणे अन्यायकारक आहे़ त्यामुळे तत्सम जातीचे उपजातीचे व पोटजातीचे कोणतेही निकष घिसाडी जमातीपुरते सिद्ध होणार नाहीत़ १९६५ च्या शासन निर्णयात घिसाडी या मुख्य शीर्षकाचे गाडी लोहार, चितोडी लोहार व राजपूर लोहार हे मुख्य शीर्षक व्हावे, असे निवेदन होते़ भाऊसाहेब चव्हाणांच्या प्रयत्नामुळे पुण्यातील घिसाड्यांचे राजपूत लोहार असे नामकरण केले़ त्या आधारे शासनाने १४ आॅगस्ट १९७० च्या निर्णयात राजपूत लोहार नावाचा तत्सम शिर्षकाखाली समावेश केला़
बापट आयोगाला घिसाडी समाजाचा विरोध
By admin | Updated: July 21, 2014 00:36 IST