शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बनवाबनवी ! महिला व बालहक्क विधीमंडळ समितीची जाताच बचत गटांचे 'कॉप-शॉप' गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 19:15 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची थेट विक्री करणारे कॉप - शॉप या नावाने खुलताबाद पंचायत समिती अभियान व्यवस्थापन कक्षाने सुरु केले होते.

- सुनील घोडके खुलताबाद (औरंगाबाद ) :  महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या महिला व बालहक्क समितीने आज खुलताबाद येथे भेट देवून माहिती घेतली. या समितीला खुश करण्यासाठी अधिकाऱ्यांनी बचत गटाच्या महिलांच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले होते. समितीने पाठ फिरविताच हे दुकान गुंडाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे  अधिका-यानी समितीबरोबर बनवाबनवी केल्याची चर्चा पंचायत समिती आवारात होती. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची थेट विक्री करणारे कॉप - शॉप या नावाने खुलताबाद पंचायत समिती अभियान व्यवस्थापन कक्षाने सुरु केले होते. मात्र, हे दुकान काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते मात्र उद्घाटनंतर काही तासातच हे कॉप - शॉप दुकान गुंडाळून ठेवण्यात आले होते. दरम्यान आज गुरुवार दिनांक २८ रोजी महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या महिला व बालहक्क समितीच्या आमदार मनीषा कायंदे , आमदार लताबाई सोनवणे , आमदार मंजुळा गावित या महिला व बालकांचे समस्या जाणून घेण्यासाठी व शासनाने त्यांच्या करिता असलेल्या विविध योजना किती प्रभावीपणे राबविण्यात आल्या याची माहिती घेत असताना  विधी मंडळ समितीस खुश करण्यासाठी   गुंडाळून    ठेवण्यात  आलेले  कॉप - शॉप दुकान घाईघाईने मांडण्यात  आले. संमतीला बचत गट   व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू नियमित विक्री करण्यात येत असल्याची माहिती देवून अधिकारी व कर्मचार्यांनी शाबासकी मिळविली. मात्र, समिती जाताच   कॉप - शॉप दुकान गुंडाळून ठेवण्यात आले. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या बनवाबनवीची चर्चा पंचायत समिती आवारात चांगलीच रंगली होती. 

समितीने नगरपरिषद कार्यालयात घेतला आढावा महिला व बालहक्क समितीनेनगरपरिषदेत महिलांच्या  बचत गटाच्या  बाबतीत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत माहिती घेतलीत्याच बरोबर महिलांचा आरोग्य सर्वे करणे , महिलांचे शंभर टक्के लसीकरण करणे तसेच १४ व्या वित्त आयोगातून महिलांसाठी ५ टक्के राखीव ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी नगराध्यक्ष एस. एम. कमर , शिवसेना तालुका प्रमुख राजू वरकड , तहसीलदार सुरेंद्र देशमुख , गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर , मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी , महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लक्ष्मीताई लाळे ,कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ ,यांच्यासह पदाधिकारी ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद