शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

‘संग्राम’मध्येच बँका !

By admin | Updated: August 3, 2014 01:16 IST

बीड : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत आता ग्रामपंचायतींमध्येख बँकींग सुविधाही उपलब्ध झाली आहे. जि

बीड : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत आता ग्रामपंचायतींमध्येख बँकींग सुविधाही उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतींमधून हा प्रयोग राबविण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे बँकेसाठी शहर, तालुके व मोठ्या गावांचे हेलपाटे तर वाचणारच आहेत शिवाय ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन व विविध शासकीय अनुदान मिळणेही सुकर होईल.जिल्ह्यात एकूण १०२४ ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षातून १८ प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. ग्रामीण जनतेला बँकींग सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी संग्राममधूनच ही सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला. मिनी बँकात मिळणाऱ्या सुविधामिनी बँका थेट राष्ट्रीयीकृत बँकांना जोडलेल्या असतील. यातून पैसे पाठविणे, पैसे जमा करणे, कर्जप्रकरण, धनाकर्ष काढणे आदी कामे केली जातात. शासनाकडून येणारे विविध अनुदानही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा सेविका, ग्रामरोगार सेवक, अंगणवाडी सेविका यांचे वेतनही यापुढे या बँकांमध्येच जमा होईल. त्यामुळे ग्रामस्थांचे बँकांतील हेलपाटे थांबतील, असे सामान्य प्रशासन विभागातील सांयिकी विस्तार अधिकारी चंद्रकांत पांडव म्हणाले़येथे सुरु आहेत मिनी बँकाशिरुर तालुक्यातील घाटशिळ पारगाव, राक्षसभुवन, कान्होबाचीवाडी, घोगस पारगाव, लिंबा, पौंडूळ, आर्वी परळी तालुक्यातील दाऊदपूर, बेलंबा, बोधेगाव, नांदडी, नाथ्रा, कौठळी, नंदणज, कासारवाडी, पाटोदा तालुक्यातील मुगगाव, पारनेर, तळे पिंपळगाव, पिंपळगाव धस, गवळवाडी आष्टी तालुक्यातील चिंचपूर, आष्टा, मातकूळी, पोखरी, शेरी (खू.), हनुमंतगाव, साबलखेड, गंगादेवी, सावरगाव घाट या गावात सुविधा उपलब्ध आहे.आॅपरेटर्सना प्रशिक्षणसंग्राम कक्षांतर्गत सुरु केलेल्या बँकींग सुविधेसाठी आॅपरेटर्सना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले गेले. उर्वरित आॅपरेटर्सनाही टप्प्याटप्प्याने प्रशिक्षित केले जाईल, असे संग्रामचे जिल्हा समन्वयक प्रदीप जोगदंड यांनी सांगितले. गाव ज्या राष्ट्रीय बँकेकडे दत्तक आहे, त्या बँकेची उपशाखा कार्यान्वित केली जाते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)