शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेचे ३३ लाख लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

वाळूज महानगर : बजाजनगरातील गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेले ३३ लाख ५० हजार रुपये

वाळूज महानगर : बजाजनगरातील गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेले ३३ लाख ५० हजार रुपये आज दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला; परंतु बँक कर्मचाऱ्यांच्या धैर्य व सावधानतेमुळे हा प्रयत्न फसला. यामुळे औद्योगिक क्षेत्राच्याच सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. औरंगाबादमध्ये रात्री एटीएम फोडण्याचे अलीकडच्या काळात अनेक प्रयत्न झाले. येथे तर भर दुपारी लुटीचा प्रयत्न झाला.गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात हे एटीएम आहे. नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी पैसे टाकण्यासाठी सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान आले. चारचाकी वाहन उभे करून एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेली ३३ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग घेऊन कस्टोडियन संदीप धामोडे, सुरक्षारक्षक हनीफ शाह आणि रमेश मोहिते हे तिघे जात होते. तेवढ्यात एका तरुणाने काळ्या रंगाची पल्सर गाडी त्यांच्यामधून घातली. गाडी आल्याने तिघांपैकी एक जण मागे राहिला. ही संधी साधून काळ्या रंगाचे जॅकेट, पँट व लांब केस असलेल्या दोन अनोळखी तरुणांनी झडप मारून एटीएम आॅफिसर व बंदूकधारी सुरक्षारक्षक यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बॅग हिसकावण्यास सुरुवात केली; परंतु आॅफिसर धामोडे यांनी बॅग सोडली नाही. ही थरारक खेचाखेच जवळपास ५ ते १० मिनिटे सुरू होती. हा प्रकार बघून गाडीतील चालक जगदीश तावडे व एटीएम आॅफिसर दिनेश सूर्यवंशी यांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी पळ काढला. ते अग्निशमन दल कार्यालयाच्या मागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. डोळ्यात मिरची पावडर गेलेल्या संदीप धामोडे, जगदीश तावडे व हनीफ शाह यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नेहमीप्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकेकडून कोणीही तक्रार देण्यास आले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले.४या चौकात हातगाडीवाले, टपरीचालक, मोबाईल शॉपी असे अनेक व्यावसायिक असल्याने हा चौक नेहमी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. भरदिवसा डोळ्यांसमोर हा प्रकार सुरू होता; परंतु कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. ४कोणी मदतीला धावले असते तर हे चोरटे रंगेहाथ पकडले गेले असते; परंतु सर्वांनीच केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने चोरटे आरामात पसार होण्यात यशस्वी झाले. १वाळूज औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चोऱ्या, लूटमार इ. गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात वाळूज एमआयडीसी पोलीस अपयशी ठरत आहेत. २गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला असून संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचीच सुरक्षितता धोक्यात आली आहे.३दिवसेंदिवस चोरी, लूटमारीच्या वाढत्या घटनांमुळे बजाजनगर, सिडको महानगर, वडगाव, पंढरपूर, वाळूज, जोगेश्वरी इ. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.