शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाच्या उद्देशाला ‘खो’ देत पर्यटन बसमधून ‘बँड बाजा बारात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:16 IST

एसटीला वातानुकूलित बस विकत घेण्यात अडचणी असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून पर्यटन विकासासाठी मिळालेल्या १ कोटी ८० लाखांच्या निधीतून या दोन बसेस घेण्यात आल्या. 

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीच्या निधीतील बस थेट आंतरराज्य मार्गावर

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या वातानुकूलित पर्यटन बसमधून चक्क ‘बँड बाजा बारात’ सुरू आहे. एका लग्नासाठी पर्यटन बस थेट गुलबर्गा येथे पाठविण्यात आल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.

शहरात येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद शहराहून जगप्रसिद्ध अजिंठा किंवा वेरूळ लेणी येथे जाण्यासाठी साधी बस किंवा खासगी गाड्यांचा वापर करावा लागत होता. परदेशी पर्यटकांसाठी औरंगाबादहून अजिंठा लेणीपर्यंतचा ३ तासांचा साध्या बसचा प्रवास सुसह्य नाही. त्यामुळे पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याबाबत एसटीकडे विचारणा केली. एसटीला वातानुकूलित बस विकत घेण्यात अडचणी असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून पर्यटन विकासासाठी मिळालेल्या १ कोटी ८० लाखांच्या निधीतून या दोन बसेस घेण्यात आल्या. परंतु, पर्यटक नसल्याचे कारण पुढे करून यापूर्वी या बस वारंवार पुणे मार्गावर चालविण्यात आल्या. आता पर्यटन बस लग्नासाठी बुक करण्यात आली आणि बुधवारी थेट गलबर्गा येथे रवाना करण्यात आली. पर्यटन बस लग्नासाठी गुलबर्गा येथे पाठविली, पण पर्यटक नव्हते. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नसल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक सुनील शिंदे म्हणाले.

पर्यटकांना आकर्षित करण्याकडे दुर्लक्षएसटी महामंडळाला पर्यटन बस मिळाल्या, मात्र, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फारसे प्रयत्न महामंडळाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे या बससेवेची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, पर्यटक नसल्याने बस रद्द करून पुणे मार्गावर पाठविण्याचा प्रकार होत आहे.

माहिती घेतली जाईलएसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यटन बस गुलबर्गा येथे पाठविल्यासंदर्भात काहीही माहिती नाही. अन्य बस उपलब्ध होती. ती पाठविता आली असती. याविषयी अधिक माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद