शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राच्या आधारे घर बळकावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:47 IST

बनावट कागदपत्राच्या आधारे एका महिलेचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत तिला मारहाण केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद. दि. २८ : घरमालक जवळ राहत नसल्याचे पाहून  बनावट कागदपत्राच्या आधारे एका महिलेचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत तिला मारहाण केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जुमानहिलाबी चाऊस, सबा जुमान चाऊस आणि अगबान खालेद चाऊस (सर्व रा.इंदीरानगर,गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.

याविषयी जवाहरनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजनगाव शेणपुंजी येथील आशाबाई प्रदीपकुमार लोहाडे यांच्या मालकीचे इंदीरानगर गारखेडा येथे घर आहे. त्यांनी हे  घर आरोपींना गतवर्षी भाड्याने दिले होते.   घरमालक इंदीरानगर येथे राहात नसल्याचे पाहुन आरोपींनी ते  घर बळकावण्याचा कट रचला. घराची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. यानंतर आम्ही हे घर खरेदी केल्याचे शेजा-यांना सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. ही बाब घरमालक लोहाडे यांना कळताच त्यांनी आरोपींना घर खाली करण्यास सांगितले. यावर आरोपींनी घर आमचे आहे असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत घर खाली करण्यास नकार दिला. 

हे घर तुम्हीच विक्री केल्याचे त्यांनी लोहाडे यांना सांगितले. आरोपीं बनावट कागदपत्राच्या आधारे आपले घर  बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोहाडे यांच्या लक्षात आले. याची विचारणा करताच आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर लोहाडे यांनी त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. आर. आहेर हे तपास करीत आहेत.