शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

विद्यापीठ निवडणार २९० कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक; स्थानिक निधीतुन होणार वेतन

By राम शिनगारे | Updated: June 11, 2023 19:33 IST

४५ कंत्राटी, २४५ तासिका प्राध्यापकांचा समावेश. नव्याने फाॅरेन्सिक सायन्स विभाग सुरू होणार.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मंजुर प्राध्यापकांच्या जागांपैकी तब्बल अर्ध्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रशासनाने कंत्राटी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आण धाराशिव उपपरिसरातील विभागांमध्ये प्राध्यापकांच्या २८९ जागा मंजुर आहेत. त्यापैकी १४४ जागांवर प्राध्यापक कार्यरत असून १४५ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी ७३ पदांची भरती प्रस्तावित आहे. त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठ निधीतुन कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यास व्यवस्थापन परिषदेनेही मान्यता दिलेली आहे.

२४ हजार रुपये प्रतिमहिना या प्रमाणे ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये विद्यापीठ परिसरातील २१ विभागातील ३० पदांचा समावेश असून, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेतील ९, उपपरिसरातील ६ पदांचा समावेश आहे. तासिका तत्वावरील २४५ प्राध्यापक विद्यापीठाचा मुख्य परिसर, उपकेंद्र, मॉडेल कॉलेज घनसावंगी, संतपीठ पैठण, जीएमएनआयआरडी, डीडीयुकेके, प्रीआयएएस कोचिंग सेंटर आदींसह ५५ विभागांचा समावेश आहे.

नव्याने फाॅरेन्सिक सायन्स विभाग सुरू होणारनव्याने सुरू होत असलेल्या न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स ) या विभागात कंत्राटी चार व तासिका तत्त्वावरील चार अशी आठ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने २६ जूनपर्यंत भरावेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. तर कंत्राटी पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांनी ३० जून पर्यंत अर्जाची हार्डकॉपी आस्थापना विभागात दाखल करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद