शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मनुष्यबळ विकासमंत्र्यांनाच गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:31 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला यावर्षीही विलंब होणार आहे. मागील तीन वर्षांपासून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचा पदवीदान सोहळ्याला वेळ मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला यावर्षीही विलंब होणार आहे. मागील तीन वर्षांपासून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचा पदवीदान सोहळ्याला वेळ मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्यापही यश मिळालेले नाही. यावेळीही केंद्रीय मंत्र्यांसाठीच पदवीदान सोहळ्याला विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले.विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची डॉ. बी.ए. चोपडे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच वर्षी तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पदवीप्रदान सोहळ्याला आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी पदवीप्रदान सोहळा उशिराने घेण्यात आला, तरीही स्मृती इराणी यांनी वेळ दिली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोलावून सोहळा उरकण्यात आला.यानंतरच्या वर्षीही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना बोलावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनीच ‘नॅक’च्या संचालकांची वेळ घेण्यास सांगितले. मागील वर्षी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह इतरांना निमंत्रण पाठविले. मात्र, कोणीही वेळ दिला नाही. यामुळे माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांना बोलावले.आता यावर्षीही मार्च महिना उजाडला तरीही पदवीप्रदान सोहळ्याचा पाहुणाच ठरलेला नाही. याविषयी नवनियुक्त प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना विचारले असता, त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांसह इतर काही नावांवर विचार सुरू आहे. यावर्षी जावडेकरांचा होकार मिळविण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला जाणार आहे. यात यश मिळेल, असेही डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले.