शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत विद्यापीठाला मिळाली २५ एकर जमीन; कौशल्य विकास केंद्राचा प्रस्ताव

By राम शिनगारे | Updated: December 25, 2023 12:10 IST

सातबाऱ्यावर लागले विद्यापीठाचे नाव; कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत विद्यापीठाच्या मालकीची जमीन

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात २५ एकर जमीन राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीवर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करणार आहे. जालना शहरानंतर अंबाजोगाईमध्ये विद्यापीठास कौशल्य विकास केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर २६ डिसेंबर रोजी कुलगुरूंच्या हस्ते नामफलकाचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्राची स्थापना करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच जालना येथे कौशल्य विकास केंद्रासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन उपलब्ध करून दिली. त्यासाठी तत्कालीन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी पुढाकार घेतला होता. त्याच वेळी बीड जिल्ह्यातील कौशल्य केंद्र अंबाजोगाई येथे स्थापन होण्यासाठी तत्कालीन व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे हे प्रयत्न करीत होते. त्यांनी अधिसभेच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यास भागही पाडले. त्यानुसार विद्यापीठाने अंबाजोगाई येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्हा प्रशासनाकडे २५ एकर जमिनीची मागणी केली. केंद्रासाठी जमीन उपलब्ध झाली असून, सातबाऱ्यावर विद्यापीठाचे नावही लागले आहे. आता अंबाजोगाईवासीयांना कौशल्य केंद्र लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे.

चारही जिल्ह्यांत विद्यापीठाची जमीनमुख्य परिसरात ७२५ एकर जमीन विद्यापीठाच्या मालकीची आहे. धाराशिव येथील उपकेंद्रासाठी ६० एकर, जालना येथील कौशल्य केंद्रासाठी २५ एकर तर घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजसाठी १० एकर जमीन विद्यापीठाच्या मालकीची आहे. आता बीड जिल्ह्यात अंबाजोगाईत विद्यापीठाच्या मालकीची २५ एकर जमीन झाली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत विद्यापीठाच्या मालकीची जमीन असणार आहे.

केंद्र, राज्य शासनाकडे २५ कोटींचा प्रस्तावकेंद्र शासनासह राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाला २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी कौशल्य केंद्र उभारण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय अंबाजोगाईतील कौशल्य केंद्रात आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचे मुख्यालयही करण्यात येणार आहे.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

जमीन मिळाली; आता केंद्र उभाराआम्हा अंबाजोगाईकरांची मागणी असलेले मराठी भाषा विद्यापीठ विदर्भात पळविण्यात आले. आता कौशल्य विकास केंद्रासाठी अंबाजोगाईत २५ एकर जागा मिळाली आहे. केंद्राच्या विकासासाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून देत कौशल्य केंद्र उभारून युवकांना रोजगाराभिमुख बनवावे.-डॉ. नरेंद्र काळे, अधिसभा सदस्य, अंबाजोगाई

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र