भोकर : म्हैशाजवळ अपघात होवून तीन दिवस लोटले़ पण अपघाताची झळ पोहोचलेले बल्लाळ मात्र अजूनही दु:खाच्या अंधारात चाचपडत आहे़ गावात ना चूल पेटतेय, ना हौस-मजा़ मनमिळाऊ स्वभाव असलेल्या एका कुटुंबाची दैवाने वाताहत का करावी, असाच विचार आजही गावकरी करीत असून स्मशानशांतता असलेल्या गावात अधूनमधून केवळ हुंदण्याचा आवाज तेवढा येत आहे़1बल्लाळ गावात जात असतानाच गणपत आडेलू बाजेकर यांचे पत्रे टाकून बांधलेले तीन खोल्यांचे घऱ हे घर आता कुलूपबंद आहे़ या घरात १२ जण आनंदाने जगत असत़ पण सुगी संपली की हे सर्व कुटुंब तेलंगणामधील नवीपेठ येथे वीटभट्टीवर कामाला जायचे़ मृगात हे कुटुंब आपल्या गावी परत यायचे़ तेव्हा घर आनंदाने गजबजून जायचे़ याच गणपत बाजेकर कुटुंबातील ९ जण अपघातात ठार झाले़ तर दिलीप बाजेकर याच्यावर हैदराबाद येथे व राहुल बाजेकर याच्यावर म्हैसा येथे उपचार चालू आहेत़ शुभम हा तीन वर्षांचा चिमुकला सध्या भोकर येथे आजोळी आहे़ बाजेकर यांचे कुटुंब मुळी मनमिळावू स्वभावाचे़ कोणाचं अडलं नडलं तर धावून जाणारे़ शेतीही थोडी गायराऩ पण कामाला मात्र ही मंडळी आदर होती़ कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता मेहनत करून आनंदाने जगणाऱ्या या माणसांवर दैव रुसले आणि होते ते नव्हते झाले़ तीन महिन्यांपूर्वी घराला लावलेले कुलूप पावसाच्या सरी आल्या की उघडणार होते़ पण आता हे कुलूप कोणी उघडावे असाच प्रश्न सर्वांसमोर पडतो आहे़ एका चांगल्या कुटुंबाचा शेवट असा व्हावा याच विचारात गाव वाटचाल करीत आहे़3 दु:खाच्या धक्क्यात असलेले ग्रामस्थ अजूनही चूल पेटविण्याच्या मनस्थितीत नाहीत़ केवळ गावात हुंदण्याचे आवाज येत असून गाव आजही दु:खाच्या अंधारात चाचपडत आहे़ या अपघातात रेणापूर येथील दोघांचा बळी गेला़ हीच परिस्थिती रेणापूरवासियांची आहे़ तर तीन वर्षांचा शुभम आजही मला आई-वडिलांकडे घेवून चला म्हणून रडत आहे़
दु:खाच्या अंधारात बल्लाळ
By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST