शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बालाजी-देवी पद्मावती विवाह जल्लोषात; हजारो भाविकांच्या साक्षीने औरंगाबादमध्ये पार पडला सोहळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:12 IST

रोकडिया हनुमान कॉलनीत हजारो भाविकांच्या साक्षीने बालाजी भगवंत व पद्मावती देवीचा नेत्रदिपक विवाह सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंद’ असा गजराने परिसर दुमदुमला होता. 

औरंगाबाद : रोकडिया हनुमान कॉलनीत हजारो भाविकांच्या साक्षीने बालाजी भगवंत व पद्मावती देवीचा नेत्रदिपक विवाह सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंद’ असा गजराने परिसर दुमदुमला होता. 

रोकडिया हनुमान मंदिर व पोवा बालाजी संस्थान ट्रस्टच्यावतीने भगवंतांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशाचा निनादात बालाजी भगवंतांची शोभायात्रा काढण्यात आली होती. रस्तोरस्ती सडा टाकण्यात आला होता. रांगोळी काढण्यात आली होती. सजविलेल्या रथात बालाजी भगवंताची मूर्ती ठेवण्यात आली होती. जागोजागी भाविक भगवंताचे दर्शन घेत होते व पृष्पवृष्टी करण्यात येत होती. सायंकाळी भगवंताची शोभायात्रा रोकडा हनुमान कॉलनीत पोहोचली. ब्रह्मवृंदांनी बालाजीची मूर्ती हातात घेऊन विवाह मंडपात आणली. यानंतर देवी पद्मावतीची मूर्तीही विवाह मंडपात आणल्या गेली. यावेळी हजारो भाविक ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंदा’ असा गजर करीत होते. जयंतीलाल पटेल यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची नाणेतुला करण्यात आली.

विजय कुलकर्णी, राजेंद्र सुर्यवंशी व शेखर जोश्ी यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची शर्करातुला करण्यात आली. वर पिता म्हणून संतोष दंडारे तर वधू पिता म्हणून जगदीश हरसुलकर हे होते. ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणत मंगलाष्टकाला सुरुवात झाली. कोणी अक्षता तर कोणी पुष्पवृष्टी करीत होते. बालाजी व पद्मावती भगवंतांचा विवाह झाला आणि सर्वांनी एकसाथ ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंदा,’ ‘ श्री बालाजी भगवंत की जय’ असा जयघोष करुन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर भगवंतांच्या मूर्तीची विधवत मंदिरात स्थापना करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी भानजीभाई पटेल, जितमल बगडिया, राजकुमार अग्रवाल, नरेश गुप्ता, सचिन सावजी, अ‍ॅड.रामकिशन बाहेती, जिवराजभाई पटेल, प्रदिप वाघ आदींनी परिश्रम घेतले. पौरिहित्य प्रविण कुलकणी व अरूण डावरे गुरुजी यांनी केले.  पुढील वर्षी गरीबाचे लग्न लावणार पुढील वर्षी भगवान बालाजी व पद्मावती देवीच्या विवाह सोहळ्यात गरीब घरातील वधू-वराचे लग्न लावून देण्यात येणार आहे. सर्व खर्च रोकडिया हनुमान मंदिर व पोवा बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे, अशी घोषणा मंदिराचे विश्वस्त विनोद शेवतेकर यांनी केली. आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.