शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Video: संतापजनक! विद्यापीठात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन घुसले बजरंग दलाचे कार्यकर्ते

By राम शिनगारे | Updated: February 14, 2024 16:04 IST

तोंडाला भगवे रुमाल, हातात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये आज दुपारी बजरंग दल संघटनेचे काही कार्यकर्ते घुसले. हातामध्ये लाठ्या काठ्या आणि  तलवार घेऊन तोंडाला भगवे रुमाल बांधत हे कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात फिरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर तरुणांचे हे टोळके विद्यापीठातून निघून गेले.

मागील आठवड्यात विद्यापीठांमध्ये दुचाकीवर आलेल्या काही तरुणांनी विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज विद्यापीठांमध्ये अचानक तोंडाला रुमाल बांधलेले चाळीस ते पन्नास हुल्लाडबाज तरुण घुसले. प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले की, हातात तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन विद्यापीठ परिसरात बजरंग दलाशी संबंधित या तरुणांच्या टोळक्याने धुडगूस घातला. विद्यापीठ मुख्यरस्ता, प्रशासकीय इमारत, कँटिन, रीडिंग हॉल येथे उपस्थित विद्यार्थ्यांना या टोळक्याने हुसकावले. विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करत हे टोळके चारचाकी आणि दुचाकीवरून काहीवेळाने निघून गेले. दरम्यान, बजरंग दलाचे हे हुल्लडबाज तरुण आज व्हॅलेंटाईन डे असल्याच्या निमित्ताने काही प्रेमी युगुलांवर हल्ल्याच्या उद्देशाने विद्यापीठात घुसले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षाला २ कोटी खर्च तरीही विद्यापीठात सुरक्षेचे तीनतेरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी विद्यापीठ प्रशासन प्रतिवर्षी २ कोटी रुपये खर्च करते. प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये ७५ सुरक्षारक्षक तैनात असले तरी मागील काही महिन्यांपासून विद्यापीठाच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. परिसरात विद्यार्थिनींची छेड काढली जात असताना, तेथील सुरक्षारक्षकाने प्रशासनाला साधी माहितीही दिली नसल्याचे समोर आले होते. तसेच आज घोळक्याने तोंडाला कपडा बांधून तरुण विद्यापीठ परिसरात दहशत माजवत असताना त्यांना कोणत्याची सुरक्षारक्षकाने अडवले नाही. यामुळे विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी संघटनांकडून ठिय्या आंदोलन दरम्यान, कुलगुरू दालनासमोर पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, दीक्षा पवार, जयश्री शिर्के आदी विद्यार्थी नेत्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. दहशत माजवणाऱ्या या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद