शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

'बडेबाप के बेटेबद्दल काही देणेघेणे नाही'; खा. ओवेसी आर्यन खान प्रकरणावर स्पष्टच बोलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 17:53 IST

MP Asaduddin Owaisi on Aryan Khan: सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो.

औरंगाबाद : 'बडे बाप के बेटे' बद्द्ल आपल्याला काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट मत एमआयएम (AIMIM ) प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi on Aryan Khan ) यांनी आज आर्यन खान प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त  केले. आगामी काळातील निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी खा. ओवेसी औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी खुलताबाद येथे राज्यभरातील प्रमुख नेते,पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यानंतर खा. ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

खा. ओवेसी पुढे म्हणाले, सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. अन हरलो की लक्ष ठरतो तो मोहम्मद शमी. चीकडूनही  सीमारेषेवर कुरापती सुरुच आहेत. गेल्या १८ महिन्यांपासुन लडाखचा भुप्रदेश चीनच्या ताब्यात आहे. याबाबत खासरांचे शिष्टमंडळ नेऊन परिस्थिती पाहण्याची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहोत, असेही ते म्हणाले. 

तर शिवसेना- भाजप एकत्र येतील महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार असा आहे. आता विरोधात असलेले शिवसेना आणि भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र दिसतील अशी भविष्यवाणी खा. ओवेसी यांनी केली. महाविकास आघाडी सरकाने २ वर्षे पूर्ण केली तरी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत ते उदासीन आहेत. 

२७ नोव्हेंबरला चलो मुंबई महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर आवाज उठविण्यासाठी २७ नोव्हेंबरला मुंबईत मोठी सभा घेणार असल्याचे खा. ओवेसी यांनी जाहीर केले. 'चलो मुंबई' चा नारा देत वाहनांवर तिरंगा ध्वज लावून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील. यासभेस ओवेसी बंधू मार्गदर्शन करून मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधू असेही त्यांनी जाहीर केले. 

यावेळी औरंगाबादचे खा.इम्तीयाज जलील, धुळ्याचे फारूख अन्वर शहा , मालेगावचे आ. आमदार मुफती ईस्माईल ,माजी आ. वारीस पठाण, गफ्फार कादरी यांची उपस्थिती होती. प्रारंभी सकाळी १० वाजता राज्यातील प्रमुख शहरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिका-यांची जिल्हानिहाय बैठक घेवून पक्षसंघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विश्रामगृह परिसरास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAryan Khanआर्यन खान