शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणात बबलाचा भाऊ अमजदला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:22 IST

तरुणाचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यापासून पसार झालेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेने माळीवाडा येथे रविवारी रात्री अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तरुणाचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यापासून पसार झालेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेने माळीवाडा येथे रविवारी रात्री अटक केली. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार बबलाचा भाऊ आहे.शेख अमजद शेख असद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. १६ मे रोजी हिलाल कॉलनी येथील शेख जब्बार या तरुणाचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह दौलताबाद घाटातील एका विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार बबला ऊर्फ शेख वाजेद शेख असद यास १ जून रोजी अटक केली. त्याने या गुन्ह्यात त्याचा भाऊ शेख अमजद आणि अन्य आरोपी होते असे पोलिसांना सांगितले. गुन्हा घडल्यापासून पळालेला अमजद माळीवाडा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. रविवारी रात्री आरोपीचा शोध घेतला असता तो एका घरात लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास चोहोबाजूने घेरून शेख अमजदला पकडले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोनवणे, कर्मचारी सुभाष शेवाळे, शेख बाबर, सुधाकर राठोड, अशरफ सय्यद, योगेश गुप्ता, नवाब शेख, सिद्धार्थ थोरात आणि नितीन धुळे यांनी केली.